शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra : “भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसतोय, भाजपचा रोष त्याचा पुरावा,” काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 08:08 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी ७ सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रे’ची सुरूवात केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ७ सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रे’ची (Bharat Jodo Yatra) सुरूवात केली आहे. या प्रवासाला ६५ दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. काँग्रेसचा हा प्रवास जनतेतून काय साध्य करू शकला? या भेटीचा उद्देश पूर्ण होतोय का? काँग्रेसची दिशा ठरवली जात आहे का? या सर्व प्रश्नांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी उत्तरं दिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव जाणवत असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितलं. भाजपचा रोष याचा पुरावा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“काँग्रेसचे घटक पक्ष भारत जोडो यात्रेला पाठिंबा देत आहेत. सर्वत्र त्याला जनतेची चांगली जोड मिळत आहे. आमचे मनापासून स्वागत करण्यात आले. राहुल गांधींच्या या भेटीचा परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून हा प्रवास हिंगोली येथे पोहोचला आहे. नांदेडमध्ये एक जबरदस्त रॅली निघाली. याठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, जयंत पाटील हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सामील झाले,” असं जयराम रमेश म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

विरोधी पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव आधीच जाणवत आहे, पंतप्रधान मोदी दक्षिणेतील ४ राज्यांना भेट देत आहेत यावरून तुम्हाला त्याचा परिणाम समजू शकतो. काँग्रेसने यापूर्वीच त्या राज्यांचा दौरा केला आहे. माझ्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची निवड केली कारण या राज्यांमध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या 60 दिवसांत पार पडली असल्याचं जयराम रमेश म्हणाले.

टीकाकारही सहभागी“राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला केवळ काँग्रेस समर्थकांचाच किंवा कार्यकर्त्यांचाच पाठिंबा मिळत नाही, तर पक्षाचे टीकाकारही या यात्रेत सामील झाले आहेत. त्यांनाही भारत जोडो यात्रा काय आहे, राहुल गांधी काय करतायत आणि ही का सुरू केली हे जाणून घ्यायचे आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

भाजपला भीती“काँग्रेसच्या या यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचं वातावरण आहे, असं मला वाटतं.  त्यामुळे पंतप्रधान मोदी भेट देत आहेत. अर्थात या दौऱ्यात विविध प्रकारचे फोटो ऑप्शन्स असतील. पण लोकांसोबत चालणे आणि त्यांचे ऐकणे यातून निर्माण झालेल्या नात्याशी कोणताही कृती जुळू शकत नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस