आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 06:00 PM2020-12-22T18:00:40+5:302020-12-22T18:02:12+5:30

ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे.

Bengal assembly elections CM Mamata Banerjee attacks centre gov and Amit Shah | आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर

आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर

Next

कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. "बंगाल दौऱ्यावेळी गृह मंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालचे चुकीचे चित्र दर्शवले असल्याचे म्हणत, राज्यातील राजकीय हिंसाचार आता कमी झाला आहे. मात्र, आत्महत्यानादेखील राजकीय हत्या असल्याचे म्हटले जात आहे. एवढेच नाही, तर भाजप पती-पत्नीच्या भांडणांनाही राजकीय भांडण असल्याचे म्हणत आहे," असे ममतांनी म्हटले आहे.

ममता म्हणाल्या, पश्चिम बंगाल अनेक मानकांवर केंद्रापेक्षा अधिक चांगले काम करत आहे. बंगाल 100 दिवसांचे काम देण्यात, ग्रामीण भागातील गृहनिर्माण, ग्रामीण भागातील रस्ते, ई टेंडरिंग आणि ई गव्हर्नन्सच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. एवढेच नाही, तर बंगालचा जीडीपी त्यांच्या कार्यकाळात 2.6 पट वाढला असून बंगालमध्ये 1 कोटी नोकऱ्या  तयार करण्यात आल्या आहेत.

आत्महत्यांनाही राजकीय हत्या म्हणतात - ममता
ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे. मात्र, बंगाल दौऱ्यावर आलेले गृह मंत्री आत्महत्यांनाही राजकीय हत्या सांगत आहेत. एवढेच नाही, तर भाजप पती-पत्नीच्या भांडणांनाही राजकीय रंग देत आहे. 

ममतांनी राज्य सरकारची आकडेवारी सादर करत सांगितले, की राज्यात 383 माओवाद्यांनी सरेंडर केले आहे. केएलओशी संबंधित 370 जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. नक्षल प्रभावित भागांत आणि जंगलमहलमध्ये शांतता आहे. तसेच राज्यात शांततामयरित्या सण-उत्सव साजरे होत आहेत. याशिवाय राज्यातील शाळांचा ड्रॉपआऊट दर कमी झाला आहे. तसेच शिशू मृत्यू दरही 34 टक्यांवरून 22 टक्क्यांवर आला आहे.

अमित शाहंनी मी दिलेले आकडे खोटे सिद्ध करावेत -
गृहमंत्री अमित शाह यांनी मी सांगितलेले आकडे खोटे सिद्ध करून दाखवावेत. बंगालमध्ये 99 टक्के शाळांत टॉयलेटची व्यवस्था आहे. अमित शाह यांना त्यांचा दौरा करायची इच्छा आहे? असेल तर आम्ही त्या शाळा आधी सॅनिटाईझ करून देऊ, असा टोलाही ममता यांनी यावेळी लगावला.

Web Title: Bengal assembly elections CM Mamata Banerjee attacks centre gov and Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.