शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग, राजन यांच्यामुळेच सार्वजनिक बँका डबघाईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 04:44 IST

निर्मला सीतारामन; एका फोनवर कर्जांचे वाटप होत असे

न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकार्दीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती खूपच वाईट होती, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

येथील कोलंबिया विद्यापीठाच्या स्कूल आॅफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समधील व्याख्यानात त्या म्हणाल्या की, या दोघांमुळे त्या काळात थकीत कर्जांचे प्रमाण प्रचंड वाढून सरकारी बँकांची स्थिती पार बिघडली. आपण सरकारी बँकांची बिघडलेली घडी पुन्हा नव्याने बसविण्यावर प्राधान्य देणार आहोत. डॉ. राजन यांच्याविषयी मला अतीव आदर आहे. पण ते आरबीआयचे गव्हर्नर असताना बँकांनी वाटेल तशी कर्जे वाटली. त्यांची कर्जफेड झाली नाही. थकीत कर्जांचे प्रमाण वाढण्यास त्यामुळे तेच जबाबदार आहेत.

सीतारामन म्हणाल्या की, अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या स्थितीत असताना डॉ. राजन यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून निवड झाली. पण त्यांच्या काळात थकीत कर्ज व घोटाळ्यांमुळे सरकारी बँकांची घसरण सुरू झाली, ही वस्तुस्थिती आहे. राजन यांच्या काळात केवळ एका फोनवर अनेक कर्जे मंजूर झाली. त्यामुळे सरकारी बँका डबघाईला आल्या. ही सर्व माहिती आता बाहेर येत आहे. या बँकांचे गाडे रुळावर आणावे लागेल. या बँका त्यासाठी केंद्र सरकारवरच अवलंबून आहेत.

त्यामुळेच रघुराम राजन आज जे काही बोलतात, त्याविषयी आपणास शंका येते, असे सांगून अर्थमंत्री म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान व डॉ. रघुराम राजन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानाच सार्वजनिक बँकांची थकीत कर्जे ९१९0 कोटी रुपयांवरून २.१६ लाख कोटींवर गेली, हे विसरून चालणार नाही. (वृत्तसंस्था)सिंग, राजन यांना दिले प्रत्युत्तरडॉ. मनमोहन सिंग व रघुराम राजन यांनी गेल्या काही दिवसांत देशाची आर्थिक स्थिती बिघडल्याच्या कारणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. डॉ. रघुराम राजन यांनी मोदी सरकारने पहिल्या पाच वर्षांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी केली नसल्याची टीका केली होती. सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचेही ते म्हणाले होते. देशात सध्या मंदीचे वातावरण असून, त्यास मोदी सरकारची आर्थिक धोरणे कारणीभू आहेत. नोटाबंदी आणि घाईघाईने जीएसटी लागू केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि लाखो लोकांचा रोजगार गेला आहे, असे डॉ. सिंग म्हणाले होते. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी त्या दोघांवरच टीका केली.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन