शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सावधान!! फेसबुकवर 'I Love You' टाकल्यास होणार शुभमंगल

By admin | Updated: February 5, 2015 14:14 IST

यंदा व्हॅलेंटाईन डेला सार्वजनिक ठिकाणांसोबतच सोशल मिडीयावर जाहीर प्रेम व्यक्त करणा-यांवर नजर ठेवणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मेरठ, दि. ५ - फेसबुक, ट्विटर, वॉट्स अॅप यासारख्या सोशल मिडीयाद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा तुमचा इरादा असेल तर सावधान. यंदा व्हॅलेंटाईन डेला सार्वजनिक ठिकाणांसोबतच सोशल मिडीयावर जाहीर प्रेम व्यक्त करणा-यांवर नजर ठेवणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे. सोशल मिडीयावर प्रियकर अथवा प्रेयसीला उद्देशून आय लव्ह यू असे टाकल्यास हिंदू महासभेचे कार्यकर्ते त्या प्रेमी युगूलाचे लग्न लावून देणार आहेत. 
हिंदू महासभेने व्हॅलेंटाईन डेला आंतरधर्मीय विवाह लावणार असल्याचे जाहिर केले होते. यामाध्यमातून घरवापसीचा कार्यक्रम राबवण्याचा हिंदू महासभेचा प्रयत्न होता. आता त्या पाठोपाठ हिंदू महासभेने व्हॅलेंटाईन डेविरोधात आणखी एका नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. व्हॅलेंटाइन डेला सोशल मिडीयावर नजर ठेवण्यासाठी हिंदू महासभेने आठ पथकं तयार केली असून ही पथक सोशल मिडीयावर साथीदाराला उद्देशून आय लव्ह यू असा संदेश टाकणा-या तरुणाईवर नजर ठेवणार असल्याचे हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. ८ फेब्रुवारीपासून ही पथकं कार्यरत होणार आहे. दिल्ली निवडणूक संपताच आमची पथकं तरुणाईवर नजर ठेवेल. सुरुवातीला आम्ही त्यांना खरं प्रेम काय असते हे समजवून पाश्चिमात्त्य संस्कृतीचे अनुकरण करु नका हे सांगू. यावर त्या प्रेमी युगूलाने प्रतिसाद दिला नाही तर त्यांना मेल पाठवून त्यांचा मोबाईल नंबर व घराचा पत्ता मागितला जाईल आणि त्यांच्याशी संपर्क साधू. तसेच त्यांच्या पालकांना सांगून त्यांचे लग्नही लावू दिले जाईल असे कौशिक यांनी सांगितले. एखादे युगूल खरंच प्रेम करत असेल तर त्यांचे लग्न लावून देण्यात गैर काय असा उलट सवालही कौशिक यांनी उपस्थित केला. सोशल मिडीयासोबतच मॉल, बगिचा अशा सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या प्रेमी युगूलांनाही शिक्षा केली जाईल असा इशाराही हिंदू महासभेने दिला आहे.  हिंदू महासभेच्या या उपक्रमाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे.