"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:00 IST2026-04-09T17:58:26+5:302026-04-09T18:00:31+5:30

आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवल्याने त्याच्या वडिलांचे ६ लाख रुपये सायबर गुन्हेगारांच्या हातात जाण्यापासून वाचले.

bareilly digital arrest cyber fraud student saves 6 lakh family | "दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख

AI फोटो

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवल्याने त्याच्या वडिलांचे ६ लाख रुपये सायबर गुन्हेगारांच्या हातात जाण्यापासून वाचले. सायबर गुन्हेगारांनी या विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना 'डिजिटल अरेस्ट' करून तब्बल ९ तास दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या नावाखाली धमकावलं होतं. कुटुंबाची सर्व माहितीही मिळवली होती. मात्र मुलाने रात्री पालकांचा मोबाईल बंद केला आणि त्यांची या जाळ्यातून सुटका झाली. सकाळी फोन सुरू करताच पुन्हा कॉल येऊ लागल्याने त्यांनी प्रेमनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

प्रेमनगरच्या सुर्खा परिसरात राहणारे संजय कुमार एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांची पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका आहे आणि मुलगा तन्मय आठवीत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ च्या सुमारास संजय यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. फोन करणाऱ्याने आपण दिल्ली पोलिसांतून बोलत असल्याचं सांगितलं.

सुरुवातीला संजय यांच्या पत्नीचं नाव आणि नंबर अचूक सांगितला. त्यानंतर त्याने दावा केला की, त्यांच्या पत्नीचं नाव एका दहशतवादी संघटनेशी जोडले गेले असून त्यांच्या नावावर कोट्यवधींचं फंडिंग झालं आहे. यामुळे संजय प्रचंड घाबरले. गुन्हेगारांनी कुटुंबात किती सदस्य आहेत, अशी विचारणा केली असता संजय यांनी सर्व माहिती दिली.

पुणे एटीएसच्या नावाखाली धमकी

यानंतर सर्वांना एकाच ठिकाणी जमवून व्हिडीओ कॉलवर येण्यास सांगण्यात आलं. "हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित असल्याने आम्ही तुमचा कॉल पुणे एटीएसकडे ट्रान्सफर करत आहोत" असं सांगून दुसऱ्या टोळीने बोलणं सुरू केलं. त्यांनी संजय यांच्या पत्नीच्या नावे एक बनावट वॉरंट तयार करून व्हॉट्सएपवर पाठवलं आणि अटक करण्यासाठी आमचे पथक येत आहे, अशी धमकी दिली.

मुलाने वाचवले ६ लाख रुपये

सायबर गुन्हेगार कुटुंबाचा मानसिक छळ करून पैसे लुटत होते, मात्र तन्मयने चतुराई दाखवली. त्याने रात्री पालकांचा फोन बंद करून त्यांना या विळख्यातून बाहेर काढलं. सकाळी पोलिसांनी तातडीने संजय यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन ते सुरक्षित केले. संजय यांच्या खात्यात ६ लाख रुपये होते. या धाडसी कारवाईनंतर एसएसपी अनुराग आर्य यांनी प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या सायबर टीमला १० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच पोलिसांनी कुटुंबाचं समुपदेशन करून हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचं त्यांना पटवून दिलं.

Web Title : साइबर धोखाधड़ी विफल: होशियार बेटे ने परिवार को आतंकवादी घोटाले से बचाया

Web Summary : उत्तर प्रदेश में एक छात्र ने पुलिस बनकर आतंकवाद लिंक की जांच कर रहे साइबर अपराधियों से अपने माता-पिता को ₹6 लाख खोने से बचाया। लड़के के हस्तक्षेप करने, उनके फोन बंद करने और पुलिस से मदद मांगने से पहले परिवार को नौ घंटे तक 'डिजिटल अरेस्ट' में रखा गया।

Web Title : Cyber Fraud Averted: Clever Son Saves Family from Terrorist Scam

Web Summary : A student in Uttar Pradesh saved his parents from losing ₹6 lakh to cyber criminals posing as police investigating terrorism links. The family was held in 'digital arrest' for nine hours before the boy intervened, switching off their phones and seeking police help.