शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशींनी धर्मांतर करावे, अन्यथा देश सोडावा - बजरंग दल

By admin | Updated: December 24, 2014 16:23 IST

बांग्लादेशींनी धर्मांतर करावे अन्यथा देश सोडावा असा धमकीवजा इशाराच मेरठमधील बजरंग दलाचे नेते बलराज डुंगर यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेरठ, दि. २४ - धर्मांतरावरुन निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे नसून आता बजरंग दलाने बांग्लादेशींना धर्मांतर करण्याचा इशारा दिला आहे. बांग्लादेशींनी धर्मांतर करावे अन्यथा देश सोडावा असा धमकीवजा इशाराच मेरठमधील बजरंग दलाचे नेते बलराज डुंगर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे बलराज डुंगर यांच्या विधानाशी विहिंप नेत्यांनीच असहमती दर्शवली आहे. 
धर्मांतरावरुन निर्माण झालेल्या वादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली व हिंदूत्ववादी संघटनांनी 'घर वापसी' या कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र मोदींनी नाराजी दर्शवूनही हिंदूत्ववादी नेत्यांनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच ठेवली आहे. मंगळवारी मेरठमधील बजंरग दलाचे नेते बलराज डुंगर म्हणाले, ४३ वर्षांपूर्वी अनेक बांग्लादेशी भारतात आले, बांग्लादेश युद्धानंतरही ते पुन्हा मायदेशी परतले नाहीत. या बांग्लादेशींनी देश सोडावा अन्यथा हिंदू धर्म स्वीकारावा, त्यामुळे  किमान हिंदू धर्मीयांची संख्या तरी वाढेल असे वादग्रस्त स्पष्टीकरणही त्यांनी दिले. विश्व हिंदू परिषदेचे सुदर्शनचक्र यांनी डुंगर यांच्या विधानाशी असहमती दिली. सरकारी आकडेवारीनुसार भारतात लाखो बांग्लादेशी राहत असून त्यांच्यामुळे भारतातील गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत, भारतविरोधी कृत्यांमध्ये त्यांचा समावेश असतो, त्यामुळे त्यांच्या धर्मांतराचा प्रश्नच निर्माण होत नाही. सर्व बांग्लादेशींनी भारत सोडावे हीच आमची भूमिका असल्याचे सुदर्शनचक्र यांनी सांगितले.