शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विद्यापीठे, कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ विक्रीस बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 2:48 AM

‘यूजीसी’चे निर्देश; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : देशभरातील सर्व विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांच्या कॅम्पसमध्ये चमचमीत परंतु सत्वहीन अन्नपदार्थांच्या (जंक फूड) विक्रीस पूर्ण बंदी करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. केवळ कॉलेजच्या कॅन्टिनमध्येच नव्हे तर विद्यार्थ्यांनी एरवीही ‘जंक फूड’चा त्याग करावा यासाठी त्यांचे समुपदेशन करून आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यावरही आयोगाने भर दिला आहे.आयोग म्हणतो की, विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ला बंदी केल्याने आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे नवे मापदंड प्रस्थापित होतील. याने विद्यार्थ्यांचे आयुष्य अधित आरोग्यसंपन्न होईल, ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील व त्यांच्यातील अतिलठ्ठपणाचे प्रमाणही कमी होईल. जीवनशैलीशी निगडित व्याधींचे अतिलठ्ठपणाशी निकटचे नाते असल्याने विद्यार्थी अशा व्याधींपासूनही मुक्त राहू शकतील. खरं तर आयोगाने असे निर्देश विद्यापीठांना द्यावेत, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २० आॅक्टोबर २०१६ रोजीच दिला होता. त्यानुसार आोयगाने लगेच विद्यापीठांना पत्रही पाठविले होते. परंतु त्याची पारशी अंमलबजावणी न झाल्याचे दिसल्याने आता आयोगाने जुन्या पत्राचा संदर्भ देत तेच निर्देश नव्याने जारी केले आहेत. या निर्णयाची कसोशीने अंमलबजावणी करावी आणि तरुणपिढी मित्रपरिवाराच्या दबावाने वाईट सवयींच्या सहजपणे आहारी जाण्याची शक्यता असल्याने त्याविरुद्ध कल्पकतेने जनजागृतीही करावी, असेही विद्यापीठांना सांगण्यात आले आहे.स्निग्धपदार्थ, मीठ व साखरेचे प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ तरुण पिढीच्या आरोग्यास घातक असल्याने तरुणांना यापासून परावृत्त करण्यासाठी खास प्रयत्न केले जावेत, असा आग्रह महिला व बालकल्याण मंत्रालयाने धरल्यानंतर शिक्षणक्षेत्रात हे पाऊल उचलले गेले आहे. याधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएई) असे निर्देश त्यांच्या संलग्न शाळांना दिले होते.विद्यापीठांकडून काय आहेत अपेक्षा?‘जंक फूड’चे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे.विद्यार्थ्यांना सुआरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी आधी त्यांची आरोग्यविषयक माहिती गोळा करणे.आरोग्याविषयी डोळसपणा येण्यासाठी अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रम घेणे.विद्याथी कल्याण विभागात ‘ वेलनेस क्लस्टर’ तयार करणे. तेथे सकस खाणे, योग्य व्यायाम आणि आरोग्यदायी सवयींवर समुपदेशन करणे.

टॅग्स :Junk Foodजंक फूडcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी