शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 7:31 PM

भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेलं पुस्तक वादात

मुंबई: भाजपानं प्रकाशित केलेलं 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक वादात सापडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असं म्हणत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुस्तकावर तातडीनं बंदी घालण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील नव्या पुस्तकावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. 'त्यांची (मोदींची) तुलना किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. भाजपाच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्राचेही एक खासदार उपस्थित होते. या पुस्तकावर राष्ट्रीय अध्यक्षांनी ताबडतोब बंदी आणली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे हे बोलण्याचा मला अधिकार आहे,' अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.शाब्बास भाजपा; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'वरुन शिवसेनेचा खोचक टोला 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचं आज नवी दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात प्रकाशन झालं. भाजपाशी संबंधित जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावरुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 'आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करतो. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज कधीच कळले नाहीत. महाराजांनी रयतेसाठी आयुष्य झिजवलं. शेतकऱ्यांसाठी खजिना रिता केला. त्यांची तुलना मोदींशी करणं ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. त्याबद्दल भाजपानं माफी मागितली पाहिजे', अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांनी केली. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पटत नाही मनाला; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीकाछत्रपती शिवाजी महाराज सूर्य होते. ज्यांच्याशी त्यांची तुलना होत आहे ते साधे काजवेदेखील नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. प्रत्येकानं स्वत:ची लायकी ओळखायला हवी. जगातील कोणत्याही राष्ट्रप्रमुखाची इतकी बौद्धिक अधोगती झाली नसेल, असं आव्हाड म्हणाले. मोदींची छत्रपतींशी तुलना?; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचं भाजप नेत्यांकडून प्रकाशनशिवसेना खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन भाजपाला खोचक टोला लगावला.  'आज के शिवाजी नरेंद्र मोदी असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी  माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा', असं म्हणत राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडRajeev Satavराजीव सातवSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस