Join us  

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 

शिवम दुबे व रवींद्र जडेजा हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट झालेले खेळाडू अपयशी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 9:17 PM

Open in App

IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना चेन्नई सुपर किंग्सच्या धावांचा ओघ आटवला. शिवम दुबे व रवींद्र जडेजा हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट झालेले खेळाडू अपयशी ठरले. फिरकीपटूंनी पंजाबला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली. ऋतुराज गायकवाड शेवटपर्यंत उभा राहिला आणि अर्धशतकी खेळी करून आयपीएल २०२४ मधील ऑरेंज कॅप नावावर केली. विराट कोहलीला त्याने मागे टाकले.. चेन्नई सुपर किंग्ससाठी ३  पर्वात ५०० धावा करणारा ऋतुराज हा सुरेश रैनानंतर दुसरा फलंदाज ठरला. 

ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 

PBKS ने नाणेफेक जिंकून CSK ला प्रथम फलंदाजीला बोलावले. तुषार देशपांडे व मथिशा पथिराणा यांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दूल ठाकूर व रिचर्ड ग्लिसन आज दिसणार आहेत. PBKS च्या कागिसो रबाडा आणि सॅम कुरन यांनी चांगला मारा करताना CSK च्या ओपनर्सना जखडून ठेवले होते. पण, ऋतुराज गायकवाड व अजिंक्य रहाणे यांनी अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर फटके खेचण्याचे लक्ष्य ठेवले. अर्शदीपच्या पहिल्या षटकात १० धावा चोपल्यानंतर पंजाबचा कर्णधार कुरनने त्याला विश्रांती दिली, परंतु पाचव्या षटकात पुन्हा अर्शदीपला १५ धावा चोपल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षठकात अजिंक्यने आत्मविश्वासाने फटकेबाजी करून १९ धावा जोडल्या. CSK च्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा झाल्या. पण, त्यानंतर पंजाबने फिरकीपटूंना आणले आणि कमी धावा आल्याने अजिंक्यवर दडपण निर्माण झाले. तो २४ चेंडूंत २९ धावांवर हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि CSK ला ६४ धावांवर पहिला धक्का बसला. शिवम दुबेला आज फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले, परंतु हरप्रीतने त्याला शून्यावर पायचीत करून मोठा धक्का दिला. राहुल चहरने १०व्या षटकात रवींद्र जडेजाला ( २) पायचीत करून CSK ची अवस्था बिकट केली. फिरकीवर खेळणे चेन्नईच्या गोलंदाजांना जड जात होते आणि त्यामुळे पंजाबचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. हरप्रीत ब्रारने ४ षटकांत १७ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. ५७ चेंडूंनंतर चेन्नईला चौकार मारता आला.  इम्पॅक्ट खेळाडू समीर रिझवी २१ धावांवर झेलबाद झाला. ऋतुराजने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि ऑरेंज कॅप शर्यतीत विराट कोहलीला मागे टाकले. मोईन अलीने चांगले फटके खेचून CSK च्या धावांना गती दिली. ऋतुराजने आणखी एक विक्रम नोंदवला आणि तो चेपॉकवर एका पर्वात सर्वाधिक ३९६ धावा करणारा फलंदाज ठरला. डेव्हॉन कॉनवेने २०२३ मध्ये ३९० धावा केल्या होत्या. ऋतुराज ४८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांवर अर्शदीपच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. MS Dhoni मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. पण, माहीसाठी पंजाबने राहुल चहरचे एक षटक राखून ठेवले होते. त्याने १९व्या षटकात मोईन अलीला ( १५) बोल्ड केले. त्या षटकात फक्त ३ धावा आल्या. चहरने १६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. 

अर्शदीपने टाकलेल्या २०व्या षटकात धोनीने १३ धावा चोपून चेन्नईला ७ बाद १६२ धावांपर्यंत पोहोचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाडपंजाब किंग्स