बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:38 IST2025-07-16T14:38:29+5:302025-07-16T14:38:59+5:30

NCERT ने दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील इतिहासाबाबत बदल केले आहेत.

'Babur was cruel, Akbar was tolerant and Aurangzeb was a temple destroyer', NCERT made major changes in the book | बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

NCERT Books:इतिहास या विषयामुळे नेहमी चर्चेत आणि वादात येणाऱ्या NCERT बोर्डाने 8च्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीईआरटीने नवीन पुस्तकांमध्ये मुघल बादशाह बाबरचे क्रूर विजेता म्हणून वर्णन केले आहे. एनसीईआरटीची ही नवीन पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. 

औरंगजेब विध्वंसक
एनसीईआरटीने आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात बदल केले आहेत. पुस्तकात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे दिली आहेत. पुस्तकात बाबरला क्रूर राजा, तर अकबराचे सहिष्णुता आणि क्रूरतेचे मिश्रण असे वर्णन केले आहे. याशिवाय, औरंगजेबाबाबतही पुस्तकात बदल केले आहेत. औरंगजेबाला मंदिरे आणि गुरुद्वारांचा विध्वंसक, असे म्हटले आहे.

पुस्तकात बदल का केले ?
पुस्तकातील बदलांबाबत अद्याप एनसीईआरटीकडून कोणतेही उत्तर किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पुस्तकांमध्ये बदल झाल्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी NCERT ने एक युक्ती अवलंबली आहे. त्यांनी एक विशेष नोंददेखील लिहिली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, 'भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही दोषी ठरवू नये.'

गेल्या वर्षीही पुस्तकांमध्ये बदल केले 
NCERT ने गेल्या वर्षीही पुस्तकांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' समाविष्ट करण्यात आले होते. यासोबतच शालेय पुस्तकांमध्ये वीर अब्दुल हमीद यांच्यावरील एक प्रकरण सामील केले होते. अब्दुल हमीद हे भारतीय सैन्याच्या चौथ्या ग्रेनेडियरचे सैनिक (CQMH) होते.

Web Title: 'Babur was cruel, Akbar was tolerant and Aurangzeb was a temple destroyer', NCERT made major changes in the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.