शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
2
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
3
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
4
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
5
Vladimir Putin In India : जग पुतिन यांचं विमान शोधत राहिलं, आकाशात सुरू होता रहस्यमय खेळ, दिल्लीतील लँडिंगनंतर उलगडलं गूढ!
6
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
7
गुजरातच्या वोटर लिस्टमध्ये १७ लाख 'मृत' मतदारांची नावं! SIRने केले मोठे खुलासे
8
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
9
आरबीआयचा रेपो दर ठरवतो तुमचे EMI आणि आर्थिक गणित! कर्ज महाग होणार की स्वस्त? सोप्या भाषेत
10
IndiGo: विमान रद्द झाल्याचं कळवलं नाही, राहण्याचीही सोय नाही; इंडिगोच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक!
11
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
12
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग पीरियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
13
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
14
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
15
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
16
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
17
वय वर्षे १२४! ठाण्याचे मनोरुग्णालय होणार आता ‘मॉडर्न’; ३,२७८ बेडची व्यवस्था, अद्ययावत किचन आणि २४×७ कॅन्टीन सुविधा  
18
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
19
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
20
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी बाबा साकार हरींच्या वकिलाने केला नवा दावा, म्हणाले, ‘’विषारी स्प्रेमुळे…’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 19:09 IST

Hathras stampede case: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात बाबा साकार हरी यांचं वकिलपत्र घेणारे वकील ए.पी. सिंह हे बाबांच्या बचावासाठी रोज नवनवे दावे करत आहेत. आज ए.पी. सिंह यांनी हाथरस येथे झालेली चेंगराचेंगरी ही जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा तसेच तिथे विषारी स्प्रेचा वापर झाल्याचा दावा केला आहे. 

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सत्संगाचा आयोजन करणाऱ्या आयोजकांसह बाबा साकार हरीविरोधातही कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जात आहेत. मात्र या प्रकरणात बाबा साकार हरी यांचं वकिलपत्र घेणारे वकील ए.पी. सिंह हे बाबांच्या बचावासाठी रोज नवनवे दावे करत आहेत. आज ए.पी. सिंह यांनी हाथरस येथे झालेली चेंगराचेंगरी ही जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा तसेच तिथे विषारी स्प्रेचा वापर झाल्याचा दावा केला आहे. हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा साकार हरी यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही. मात्र बाबांचे वकील ए.पी. सिंह त्यांच्या बचावासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी आज सांगितले की, बाबांच्या विरोधात चेंगराचेंगरीचा कट रचला गेला होता. ही चेंगराचेंगरी झाली नाही, तर घडवून आणण्यात आली. त्यासाठी हा कट रचणाऱ्यांनी विषारी स्प्रेचा वापर केला. सत्संग संपल्यानंतर एका नियोजनबद्ध कटानुसार काही लोक बाबांच्या दिशेने धावत गेले. त्यांच्या हातामध्ये विषारी स्प्रे होता. ते धावताना मागच्या बाजूने विषारी स्प्रेचा फवारा मारत बाबांच्या दिशेने गेले. सिंह यांनी पुढे सांगितले की, या स्प्रेचा प्रभाव महिलांवर पडला आणि त्या बेशुद्ध पडत गेल्या. त्या खाली पडल्या आणि गोंधळ उडाला. त्यामुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडली. काही अज्ञात लोक विषारी स्प्रे घेऊन जात होते. ते स्प्रेचा फवारा मारत पळाले, हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग दिसत आहे. अनेकजण बेशुद्ध झाले. आता या घटनेमागे कुणाचा हात आहे, याचा शोध तपास पथकाने घ्यावा, अशी मी मागणी करतो, असे एपी सिंह म्हणाले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश