आजीच्या घरातून ३ हजार क्विंटल तांदूळ, नेपाळमधून भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्या; राम मंदिरात कुठून काय येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 08:19 AM2023-12-25T08:19:53+5:302023-12-25T08:24:04+5:30

अयोध्येतील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख आता जवळ आली आहे. मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून अयोध्येला अनेक वस्तू पोहोचवल्या जात आहेत, यामध्ये आजींच्या घरून येणारे ३ हजार क्विंटल तांदूळ आणि सासरच्या घरातून येणाऱ्या भेटवस्तूंचा समावेश आहे.

ayodhya ram mandir inauguration shri ram janmbhoomi teerth What will come from where in the Ram temple? | आजीच्या घरातून ३ हजार क्विंटल तांदूळ, नेपाळमधून भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्या; राम मंदिरात कुठून काय येणार?

आजीच्या घरातून ३ हजार क्विंटल तांदूळ, नेपाळमधून भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्या; राम मंदिरात कुठून काय येणार?

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आता काहीच दिवसात होणार आहे. याबाबत मंदिराचे फोटो काल समोर आले होते. युद्धपातळीवर काम सुरू आहे, २२ जानेवारीच्या आधी सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  दरम्यान, आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही वस्तू पाठवण्यात येत आहेत. प्रभू राम यांच्या आजीच्या छत्तीसगडमधून तीन हजार क्विंटल तांदुळ येणार आहे, तसेच कपडे, फळे, सुका मेवा आणि भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० प्लेट्स नेपाळमधील त्यांच्या सासरच्या जनकपूर येथून येणार आहेत. याशिवाय भारतातील विविध राज्यांतून बऱ्याच वस्तु अयोध्येत येणार आहेत.

जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण

 राम मंदिरात कुठून काय येणार?

जानेवारीत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा अभिषेक होणार आहे. यानंतर श्री रामला विशेष नैवेद्य दाखवला जाईल, यामध्ये आजीच्या घरातील तांदूळ आणि सासरच्या घरातील सुका मेवा असेल. 

नानिहाल छत्तीसगडमधून ३ हजार क्विंटल तांदूळ अयोध्येत येणार आहे. अयोध्येला पोहोचणारी तांदळाची आजपर्यंतची ही सर्वात मोठी खेप असेल. छत्तीसगडमधील जिल्ह्यांतून ते गोळा करण्यात आले आहे.

श्रीराम यांच्या नेपाळ येथील जनकपूर सासरवाडी येथून कपडे, फळे आणि सुका मेवा ५ जानेवारीला अयोध्येला पोहोचतील. याशिवाय भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्याही असतील. 

दागिने, भांडी, कपडे आणि मिठाई याशिवाय नेपाळमधून ५१ प्रकारची मिठाई, दही, लोणी आणि चांदीची भांडी यांचाही समावेश असेल.

अष्टधातुची २१ किलोची घंटा उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून रामललाच्या दरबारात पोहोचेल. असा दावा केला जात आहे की ही देशातील सर्वात मोठी घंटा असेल, याची किंमत २५ लाख रुपये असेल. 

उत्तर प्रदेशातील एटाहून अयोध्येला पोहोचणाऱ्या घंटेची रुंदी १५ फूट आणि आतील बाजूची रुंदी ५ फूट आहे. त्याचे वजन २१०० किलो आहे. ते बनवण्यासाठी एक वर्ष लागले. 

प्राणप्रतिष्ठेसाठी गुजरातमधील वडोदरा येथून १०८ फूट लांब अगरबत्ती अयोध्येला पाठवली जात आहे, जी तयार आहे. हे पंचगव्य आणि हवन घटकांपासून बनवले जाते. त्याचे वजन ३५०० किलो आहे. 

वडोदराहून अयोध्येला पोहोचणाऱ्या या अगरबत्तीची किंमत पाच लाखांपेक्षा जास्त आहे. ती तयार करण्यासाठी ६ महिने लागली आहेत.

ही अगरबत्ती ११० फूट लांबीच्या रथातून वडोदरा ते अयोध्येला पाठवली जाईल. अगरबत्ती बनवणाऱ्या विहा भारवाड म्हणाले की, एकदा ती पेटवली की दीड महिना सतत ती जळत राहते.

राममंदिराच्या अभिषेकनंतर प्रभूच्या पादुकाही  तिथे ठेवण्यात येणार आहेत. सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत. १९ जानेवारीला पादुका अयोध्येला पोहोचतील. हे हैदराबादचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी तयार केले आहेत. 

श्रीचल्ल श्रीनिवास शास्त्री यांनी या श्री राम पादुकांसह ४१ दिवस अयोध्येची प्रदक्षिणा केली होती. त्यानंतर या पादुका रामेश्वरम ते बद्रीनाथपर्यंतच्या सर्व प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेण्यात येत असून विशेष पूजा करण्यात येत आहेत.

Web Title: ayodhya ram mandir inauguration shri ram janmbhoomi teerth What will come from where in the Ram temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.