Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 13:25 IST2020-08-05T13:24:21+5:302020-08-05T13:25:30+5:30
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते.

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"
अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. यानंतर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, पाच शतकांपासूनचा 135 कोटी भारतीयांचा संकल्प आज पूर्ण होत आहे. देशात लोकशाही पद्धतीनेच मंदिराची उभारणी केली जात आहे. यासाठी अनेक पिढ्यांनी बलिदान दिले आहे. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून संकल्प पूर्ण हेत आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो.
अयोध्या राम मंदीरासाठी अनेक महापुरुषांनी विरांगणांनी आपले बदिलान दिले आणि आखेर लोकशाही पद्धतीने, कितीही मोठा प्रश्न शांततेच्या मार्गाने सुटू शकतो. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. असेही योगी म्हणाले यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि सर्वं उपस्थित अनुपस्थित संतांचेही अभिनंदन केले. अयोध्येला सर्वात समृद्ध बनवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. रामायन सर्किटचे काम आधीच सुरू झाले आहे. आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनात्मक दिवस आहे, असेही योगी म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या -
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...