Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 01:05 PM2020-08-05T13:05:21+5:302020-08-05T13:30:41+5:30

Ram Mandir Bhoomi Pujan: मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

pm modi performs Bhoomi Pujan for ram mandir at ayohdya | Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न

Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न

Next

अयोध्या: राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.




अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण ९ शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. १२ वाजून ४४ मिनिटांनी भूमिपूजन सोहळा पार पडला.




पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९ शिळांचं पूजन करण्यात आलं. या शिळांचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलं. '१९८९ मध्ये जगभरातल्या भाविकांनी मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या. अशा २ लाख ७५ हजार विटा अयोध्येत आहेत. त्यातल्या १०० विटांवर जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे. त्यातल्याच ९ विटा आज इथे आणण्यात आल्या आहेत,' अशी माहिती पुजाऱ्यांनी भूमिपूजन सुरू असताना दिली.

नरेंद्र मोदी तब्बल २८ वर्षांनी अयोध्येत आले आहेत. याआधी ते राम जन्मभूमी आंदोलनावेळी अयोध्येत आले होते. त्यानंतर जवळपास तीन दशकांनी मोदी अयोध्येत आले. श्रीराम जन्मभूमीचं दर्शन घेणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. याआधी देशाच्या कोणत्याही पंतप्रधानानं अयोध्येतल्या हनुमानगढीचं दर्शन घेतलं नव्हतं. त्यामुळे हनुमानगढीला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरण्याचा मान मोदींना मिळाला आहे. 

Web Title: pm modi performs Bhoomi Pujan for ram mandir at ayohdya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.