वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:18+5:302015-09-01T21:38:18+5:30

करमाळा : तालुक्यातील तीव्र दुष्काळ पाहता बाजार समितीचे संचालक वैभवराजे जगताप यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून विविध उपक्रम राबविले.

Avoiding birthday expenses, helping drought affected people | वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

माळा : तालुक्यातील तीव्र दुष्काळ पाहता बाजार समितीचे संचालक वैभवराजे जगताप यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून विविध उपक्रम राबविले.
वाढदिवसानिमित्त खर्च होणार्‍या रकमेतून करमाळा तालुक्यातील धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी 200 बेंच बसविण्याचा निर्णय वैभव जगताप यांनी घेतला असून, मौजे पोंधवडी येथे पहिला बेंच बसवून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने बोरगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप, शहरातील एस.टी.कॉलनीत , संत गजानन महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण,पशुधनाची टंचाई पाहता जय गुरू गणेश गोशाळा, मौलाली नगर,कुकडे वस्ती आदी ठिकाणी मुक्या जनावरांना चारा वाटप करण्यात आला.

Web Title: Avoiding birthday expenses, helping drought affected people