शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये नक्षलींनी घडवलेल्या आयईडी स्फोटात शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 10:27 IST

सुकमामधील हल्ल्यात ९ जवान जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

रायपूर: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कोब्रा २०६ बटालियनवर आयईडीनं हल्ला केला. यामध्ये असिस्टंट कमांडेंट नितीन भालेराव यांना वीरमरण आलं आहे. तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ९ जवान जखमी झाले आहेत. काल रात्री १० च्या सुमारास सीआरपीएफचे जवान ताडमेटला परिसरातल्या बुर्कापालपासून ६ किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटात जखमी झालेले सर्व जवान कोब्रा २०६ बटालियनचे आहेत. सुकमाचे पोलीस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरनं उपचारांसाठी रायपूरला आणण्यात आलं आहे. तर असिस्टेंट कमांडेंट नितीन भालेराव यांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.नितीन भालेराव हे मूळचे नाशिकचे आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरेंनी भालेराव यांच्या कंपनी कमांडरशी संवाद साधला आहे. सध्या भालेराव यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव रायपूरहून विमानानं मुंबईला आणलं जाईल आणि तिथून ते नाशिकला आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील, त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल, अशी माहिती मांढरेंनी दिली.  शनिवारी सुरक्षा दलाचे जवान ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. सर्च ऑपरेशन सुरू असताना रात्री उशिरा काही जवान नक्षलवाद्यांनी तयार केलेल्या स्पाईक होल्समध्ये अडकून जखमी झाले. त्यानंतर काही जवान आयईडी स्फोटात जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये १० जवान जखमी झाले. या जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत.