शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच नव्हे, तर उत्तर प्रदेश, गुजरातही भाजपसाठी महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:44 IST

काँग्रेस, झामुमो आक्रमक; पोटनिवडणुकीत दलित सुरक्षेचा मुद्दा

नवी दिल्ली : कोरोना काळात बिहार विधानसभा निवडणुकीसमवेत मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेशसहझारखंड, नागालँड, कर्नाटक, मणिपूर, व ओडिशामध्ये पोटनिवडणूक होत आहे. प्रत्येकी एका जागेसाठी छत्तीसगढ, तेलंगणा व हरयाणामध्येही ३ नोव्हेंबरलाच मतदान होईल.उत्तर प्रदेशमधील ७ विधानसभा मतदारसंघातील निकाल म्हणजे दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप नेत्यांना सातही मतदारसंघांत तळ ठोकण्याचे आदेश दिले.झारखंड विधानसभेच्या पोटनिवडणूक होत असलेल्या दुमका व बेरमो मतदारसंघांवर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे वर्चस्व आहे. दुमकासाठी तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वत:चे बंधू वसंत सोरेन यांनाच उमेदवारी दिली आहे. राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांच्या झामुमोच्या दुसºया पिढीसाठी ही निवडणूक महत्त्वाची. सोरेन कुटुंबातील कलहाची चर्चा होत असताना वसंत यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षांतर्गतही संदेश देण्यात हेमंत यशस्वी झाले. आठ वेळा शिबू सोरेन, तर तीन वेळा भाजपचा लोकसभा उमेदवार दुमकातून विजयी झाला. मागील वर्षी राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या आठ जागांवर गुजरातमध्ये मतदान होणार आहे. विश्वासघातकी नेते- हा परवलीचा शब्द काँग्रेस नेते वापरत आहेत, तर काँग्रेसमधील गटबाजीमुळे कंटाळून आमदारांनी राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण भाजपकडून दिले जात आहे.ज्योतिरादित्य यांच्या नेतृत्वाची कसोटीखासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याही नेतृत्वाची कसोटी असेल. पोटनिवडणूक होणाºया २८ पैकी १६ मतदारसंघ ग्वाल्हेर, चंबल भागातील आहेत.१६ पैकी ९ मतदारसंघांत कधीकाळी बसपचे उमेदवारही विजयी झाल्यामुळे सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने त्यासाठीही रणनीती आखली आहे.काँग्रेसने २४, भाजपने सर्व, तर बसपने १८ जागांवर उमेदवार जाहीर केले. मध्यप्रदेशातील सोळाही मतदासंघांत अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या प्रभाव पाडण्याएवढी आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Uttar Pradeshउत्तर प्रदेशGujaratगुजरातJharkhandझारखंडcongressकाँग्रेसBJPभाजपा