शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 9:48 PM

Assembly Election Results 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची निवडणूक निकालानंतर प्रतिक्रियाजनतेचे आणि कार्यकर्त्यांचे मानले आभारमूल्य आणि आदर्शांची लढाई पुढेही सुरूच राहील - राहुल गांधी

नवी दिल्ली: देशभरातील पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, आणि पुदुच्चेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपची कहीं खुशी कहीं गम, अशी अवस्था झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असला, तरी आसामचा गड आणि पुदुच्चेरीमध्ये मोठी आघाडी घेण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला सर्वच ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. (assembly election results 2021 congress rahul gandhi reacts on election result in five states)

देशातील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मागील विधानसभेच्या जागाही राखता आल्याचे पाहायला मिळाले नाही. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेसचा झालेला पराभव स्वीकारला आहे. 

काय म्हणाले राहुल गांधी?

जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करतो. निवडणूक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे लाखों आभार मानतो. तसेच काँग्रेसवर ज्यांनी विश्वास दाखवला, त्या सर्वांचेही आभार मानतो. मूल्य आणि आदर्शांची लढाई पुढेही सुरूच राहील. जय हिंद, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

अशा विजयाचा काहीच फायदा नाही

कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. 

योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

दरम्यान, भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या २०० पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सनं ममतांच्या पक्षाला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप १०० च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.  

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण