West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:51 PM2021-05-02T19:51:42+5:302021-05-02T19:54:04+5:30

West Bengal Election Result 2021: शरद पवार यांनी ट्विट करत नंदीग्राम येथील प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

west bengal election result 2021 ncp sharad pawar react over nandigram election result | West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

googlenewsNext

मुंबई: देशभरात निवडणूक निकालाची धामधूम सुरू आहे. सर्वांचे लक्ष पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक निकालाकडे (West Bengal Election Result 2021) लागले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये नंदीग्राम येथे भाजपचे शुभेंदू अधिकारी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ममता बॅनर्जी विजयी झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शुभेंदू अधिकारी विजयी झाल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल, असे म्हटले आहे. (west bengal election result 2021 ncp sharad pawar react over nandigram election result)

नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूक निकालावरून संभ्रमावस्था आहे. सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी फेरमोजणी करण्याची मागणी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप मतमोजणी सुरू असून, सर्वांनी संयम राखावा, असे आवाहन तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आले आहे. यातच आता शरद पवार यांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकारावर टीका केली आहे. 

विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं

रडीचा डाव!

बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. 

शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन

यापूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात, असे ट्विट शरद पवार यांनी केले होते. 

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मोदी अपयशी ठरले, यावर निकालाने शिक्कामोर्तब केले”

दरम्यान, देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची घोषणा आज होत आहे. यातील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होते. कारण या ठिकाणी ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा लढा पाहायला मिळाला होता. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.  
 

Web Title: west bengal election result 2021 ncp sharad pawar react over nandigram election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.