Pandharpur Election Results 2021: योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 08:29 PM2021-05-02T20:29:08+5:302021-05-02T20:31:16+5:30

Pandharpur Election Results 2021: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

pandharpur election Results 2021 bjp devendra fadnavis react on pandharpur election result | Pandharpur Election Results 2021: योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Pandharpur Election Results 2021: योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Next
ठळक मुद्देपंढरपूरचा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पणरणनीती आखून ही निवडणूक लढवलीसमाधान आवताडे यांचे अभिनंदन - फडणवीस

मुंबई: देशभरात पाच राज्यांच्या निवडणूक निकालासह पोटनिवडणुकींचा निकालही (Pandharpur Election Results 2021) लागत आहे. राज्यातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवतडे यांचा ३ हजार ७१६ मतांनी विजय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके पराभूत झाले आहेत. यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंढरपूरचा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. (pandharpur election Results 2021 bjp devendra fadnavis react on pandharpur election result)

मी पंढरपूरच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की, भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवला आणि मागील दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैर कारभाराला, गलथान कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचे काम हे पंढरपूरच्या जनतेने केले आहे. पंढरपुरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आहे, हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं

रणनीती आखून ही निवडणूक लढवली

एक अतिशय जमिनीशी जुडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून गेली अनेक वर्ष राजकारणात ते आहेत आणि त्यांच्यासोबत प्रशांत परिचारक उमेश परिचारक हे देखील राम-लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत राहीले आणि एक अतिशय चांगल्याप्रकारे त्या ठिकाणी रणनीती आखून ही निवडणूक लढवली गेली. आमच्या सर्व खासदार, आमदार व नेत्यांनी तिथे अतिशय चांगल्याप्रकारे लक्ष घातले व प्रचार केला, असेही फडणवीस यांनी सांगितले.

योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...

मी करेक्ट कार्यक्रम करतो, असे म्हणालो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचे आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मोदी अपयशी ठरले, यावर निकालाने शिक्कामोर्तब केले”

समाधान आवताडे यांचे अभिनंदन

आपण जर विचार केला तर हे सरकार आल्यापासूनची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक ही आहे आणि त्या निवडणुकीत ज्या प्रकारे सत्ताधारी पक्षाच्यावतीने तिन्ही पक्ष उतरले साम, दाम, दंड असे सर्व प्रकार त्या ठिकाणी वापरले गेले. प्रशासनाचा गैरउपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर केला पण हे सगळं केल्यानंतर देखील, त्या ठिकाणी भाजपाला जनतेने निवडून दिलं. मी निमित्त आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचे अभिनंदन करतो, असे फडणवीस यांनी नमूद केले. 
 

Web Title: pandharpur election Results 2021 bjp devendra fadnavis react on pandharpur election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.