शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

Assembly Election 2021: "जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर..."; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 3:00 PM

यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress)

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करवा लागत आहे. या वेळी काँग्रेसला चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यातही विशेषतः आसाम आणि केरळमध्ये काँग्रेसला मोठी आशा होती. मात्र, आलेले निकाल पाहता काँग्रेसच्या अडचणी कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच चिन्ह दिसत आहेत. आसाम, केरळ, पदुचेरीतील तथा बंगालमधील पराभव केवळ काँग्रेसच नाही, तर राहुल गांधींनाही मोठा झटका आहे. (Assembly Election 2021 Politics voices are getting stronger about the congress rout in elections) 

यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रवक्ता रागिनी नायक यांनीही एक ट्विट करत पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, ''जर आपण (काँग्रेसी) मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर आपल्या पराभवावर आत्म-मंथन कसे करणार?''

Assembly election result 2021: बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

माजी काँग्रेस नेते संजय झा यांनीही पक्षाचे प्रदर्शन आणि निवडणूक निकालांसंदर्भात पक्षाच्या भूमिकेवर निराशा व्यक्त केली आहे. झा यांनी ट्विट करत म्हटले आहे, ''माझ्यासाठी सर्वात मोठी निराशा, काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये आत्मसमर्पण आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. काँग्रेस 2016 मध्ये, 44 जागा आणि 12.25 टक्के मतांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष होता.''

याच बरोबर, वरिष्ठ अधिवक्ता अखिल सिब्बल यांनी ट्विट केले आहे, की ''मला आश्चर्य वाटते, की काँग्रेस भाजपला हरवल्याबद्दल कधीपर्यंत इतरांचेच अभिनंदन करत राहणार...?''

West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार

पुन्हा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता -खरे तर रविवारी आलेल्या चार विधानसभा निवडणुकीचे निकाल हे राहुल गांधी आणि काँग्रेससाठी मोठा झटका आहे. यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील असंतुष्ट गटातील नेते काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. केरळमध्येही काँग्रेसला व्यवस्थित पणे एका छताखाली आणण्यास राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत. त्याचाही पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूलला बहुमतात आल्याने, आता येणाऱ्या दिवसांत राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांच्या नेतृत्वात त्यांची दावेदारीही वाढेल. मात्र, राष्ट्रीय स्थरावर काँग्रेसच भाजपला एकमेव पर्याय आहे, असे काँग्रेच्या नेतृत्वाला वाटते. मात्र, आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा - 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.

विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.

west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

राहुल गांधींना स्थापित करण्यासाठी काय करणार सोनिया गांधी? -सोनिया गांधी या राहुल गांधींना विरोधकांचा मुख्य चेहरा बनविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, ममतांच्या विजयामुळे हे आणखी कठीण होईल असे दिसते. कारण केवळ पश्चिम बंगालच नवहे, तर आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडूतही विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यांपैकी आसाम, पुदुचेरी आणि केरळमध्येही काँग्रेसला अपयशच आले आहे.

महत्वाचे म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीपासूनच जवळपास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव होताना दिसत आहे. देशातील अशा राजकीय परिस्थितीत, आता सोनिया गांधी काँग्रेस आणि राहुल गांधींना कशापद्धतीने विरोधी पक्षांचा सर्वमान्य चेहरा बनवून ठेवणार अथवा बनवणार, यासाठी त्या कोणती खेळी खेळणार हेही पाहणे तेवढेच महत्वाचे आहे. 

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१