Join us  

IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!

आयपीएलचा सतरावा हंगाम मुंबई इंडियन्सच्या संघासाठी खूप खास आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 4:15 PM

Open in App

Rohit Sharma Video : आयपीएलचा सतरावा हंगाम मुंबई इंडियन्सच्या संघासाठी खूप खास आहे. मुंबईचा संघ प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. पण, सुरुवातीपासून संघर्ष करत असलेला मुंबईचा संघ अद्याप त्याच स्थितीत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत रंगत आली असली तरी मुंबईच्या खात्यात विजयाचा दुष्काळच आहे. मुंबईला नऊपैकी केवळ तीन सामने जिंकण्यात यश आले आहे. तर सहा सामने गमवावे लागले आहेत. आताच्या घडीला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. (IPL  2024 News)

आज मुंबई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. आजचा सामना मुंबईसाठी करा किंवा मरा असाच असणार आहे. कारण लखनौविरूद्धच्या सामन्यातील पराभव मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो. त्यामुळे या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मुंबईला विजय मिळवण्याची गरज आहे. अशातच आजच्या सामन्यापूर्वी मुंबईच्या फ्रँचायझीने माजी कर्णधार रोहित शर्माचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

रोहित आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी हिटमॅनवर त्याच्या या खास दिवशी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. सूर्यकुमार यादव आणि रोहित यांनी एका अपंग चाहत्याची भेट घेऊन त्याला ऑटोग्राफ दिला. मुंबईच्या शिलेदारांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रोहितच्या कृतीने चाहत्यांना भावनिक केले. 

टॅग्स :रोहित शर्माआयपीएल २०२४सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्सऑफ द फिल्ड