शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घर-शौचालय-रस्ता-नोकरी मोदींकडून मिळवलं, पण मतदान काँग्रेसला केलं...; CM सरमा यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 15:57 IST

सरमा पुढे म्हणाले, आसाममधील हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे. यावरून सिद्ध होते की, हिंदू समाज सांप्रदायिकतेत अडकलेला नाही. आसाममध्ये सांप्रदायिकतेत कुणी अडकलेले असेल, तर तो केवळ एकच समाज आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे. बांगलादेशी वंशाच्या अल्पसंख्यक समुदायावर हल्ला चढवताना सरमा म्हणाले, या समाजातील लोकांना घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन आणि दरमहा १२५० रुपये मोदी सरकारकडून मिळाले. मात्र, त्यांनी मतदान काँग्रेसला केले. कारण त्यांना तुष्टीकरण हवे आहे. एवढेच नाही तर, त्यांचा उद्देश विकास नव्हे, तर मोदींना हटवून आपल्या समाजाचा दबदबा कायम ठेवणे होता, असेही सरमा म्हणाले, ते शनिवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

सरमा पुढे म्हणाले, आसाममधील हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे. यावरून सिद्ध होते की, हिंदू समाज सांप्रदायिकतेत अडकलेला नाही. आसाममध्ये सांप्रदायिकतेत कुणी अडकलेले असेल, तर तो केवळ एकच समाज आहे.

आसाममध्ये NDA ला 11 जागा - आसाममध्ये NDA ने 14 पैकी 11 जागा जिंकल्या. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना केवळ तीन जागाच मिळाल्या. मतांच्या टक्केवारीचा विचार करता, एनडीएला 47 टक्के तर I.N.D.I.A. ला 39 टक्के मते मिळाली. यावर बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, काँग्रेसच्या 39 टक्के मतांचे विश्लेषण केल्यास, हे संपूर्ण राज्यातून मिळालेले नाही. यातील 50 टक्के मते ही अल्पसंख्यक बहूल अशा 21 विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत, या भागांत भाजपला केवळ ३ टक्के मते मिळाली आहेत.

तीन गांधी आधीच लॉन्च झालेले आहेत - तत्पूर्वी, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकारणातील एन्ट्रीसंदर्भात प्रश्न केला असता सरमा म्हणाले होते, तीन गांधी तर आधीच लॉन्च झालेले आहेत. रॉबर्ट वड्रा आणि त्यांच्या मुलांनीही लवकरच राजकारणात यावे, अशी माझी इच्छा आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस