आसाममध्ये भाजपला बसला जोराचा झटका! हिमंत बिस्वा सरमांच्या कॅबिनेटमधील मंत्री काँग्रेसमध्ये दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:25 IST2026-03-23T09:23:25+5:302026-03-23T09:25:11+5:30

Assam Assembly Election 2026 Updates: आसाम विधानसभा निवडणूक २०२६ पूर्वी भाजपला धक्का. कॅबिनेट मंत्री नंदिता गोर्लोसा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये केला प्रवेश. हाफलोंग मतदारसंघातून आता काँग्रेसच्या तिकिटावर लढणार. वाचा सविस्तर बातमी.

Assam Assembly Election 2026 Updates: BJP suffers major setback in Assam! Minister in Himanta Biswa Sarma's cabinet Nandita Gorlosa joins Congress | आसाममध्ये भाजपला बसला जोराचा झटका! हिमंत बिस्वा सरमांच्या कॅबिनेटमधील मंत्री काँग्रेसमध्ये दाखल  

आसाममध्ये भाजपला बसला जोराचा झटका! हिमंत बिस्वा सरमांच्या कॅबिनेटमधील मंत्री काँग्रेसमध्ये दाखल  

आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हिमंत बिस्वा सरमा सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि हाफलोंगच्या विद्यमान आमदार नंदिता गोर्लोसा यांनी भाजपला सोडचिठी देत काँग्रेसचा हात धरला आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.

नंदिता गोर्लोसा यांच्या या निर्णयामागे आगामी निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले जाणे हे मुख्य कारण असल्याचे समजते. भाजपने हाफलोंग मतदारसंघातून यावेळेस रूपाली लांगथासा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्याच मतदारसंघातून डावलले गेल्यामुळे नाराज झालेल्या गोर्लोसा यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

आता काँग्रेसकडून शड्डू ठोकणार
नंदिता गोर्लोसा यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसने त्यांना हाफलोंग मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी काँग्रेसने या जागेसाठी निर्मल लांगथासा यांचे नाव जाहीर केले होते, मात्र गोर्लोसा यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याच्या आगमनानंतर निर्मल लांगथासा यांनी स्वतःहून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.

कोण आहेत नंदिता गोर्लोसा?
त्या २०२१ मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर हाफलोंगमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. आसाम सरकारमध्ये त्यांनी वीज, सहकार, खाण आणि खनिजे, तसेच क्रीडा आणि युवक कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून (कॉटन कॉलेज) प्राणिशास्त्र विषयात एम.एस्सी पूर्ण केले आहे.

Web Title : असम में भाजपा को झटका: मंत्री चुनाव से पहले कांग्रेस में शामिल।

Web Summary : असम में भाजपा को बड़ा झटका लगा है क्योंकि मंत्री नंदिता गोरलोसा टिकट न मिलने के बाद कांग्रेस में शामिल हो गईं। पहले महत्वपूर्ण विभागों को संभालने वाली गोरलोसा ने इस्तीफा दे दिया और कांग्रेस के टिकट पर हाफलोंग से चुनाव लड़ने की संभावना है। आंतरिक पार्टी की गतिशीलता ने बदलाव को बढ़ावा दिया।

Web Title : Assam BJP Suffers Setback: Minister Joins Congress Before Election.

Web Summary : Assam's BJP faces a jolt as Minister Nandita Gorlosa defects to Congress after being denied a ticket. Gorlosa, previously handling key portfolios, resigned and is likely to contest from Haflong on a Congress ticket. Internal party dynamics fueled the shift.