कुणी 'INDIA' ला तर कुणी 'भारता'ला दिल्या शुभेच्छा; आशिया कपनंतर राजकीय बॅटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 09:34 PM2023-09-17T21:34:55+5:302023-09-17T21:35:46+5:30

आशिया चषकात भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final: Some wish 'INDIA' and some wish 'Bharat'; Political batting starts after Asia Cup | कुणी 'INDIA' ला तर कुणी 'भारता'ला दिल्या शुभेच्छा; आशिया कपनंतर राजकीय बॅटिंगला सुरुवात

कुणी 'INDIA' ला तर कुणी 'भारता'ला दिल्या शुभेच्छा; आशिया कपनंतर राजकीय बॅटिंगला सुरुवात

googlenewsNext

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final : आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचे खेळाडू 15.2 षटकांत अवघ्या 50 धावावंर ऑलआउट झाले. प्रत्युत्तरात सलामीवीर इशान किशन(23) आणि शुभमन गिल(27) अवग्या 6.1 षटकांत सामना जिंकून दिला. या विजयानंतर भारतीय संघाचे देशभरातून कौतुक होत आहे. पण, या कौतुकात 'भारत विरुद्ध इंडिया' पॅटर्न पाहायला मिळत आहे. 

भारताच्या विजयानंतर काही नेते भारताचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत, तर काही नेते इंडियाचे अभिनंदन करत आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी संघाचे अभिनंदन करताना इंडिया शब्दाचा वापर केला. 

सीएम केजरीवालांचे ट्विट

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीमचे अभिनंदन करताना INDIA हा शब्द वापरला आहे. 

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनी मात्र भारत हा शब्द वापरुन भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. 

संघाचे अभिनंदन करण्यासाठी भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींचा फोटो वापरला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 'भारताचे' अभिनंदन केले

काय आहे भारत विरुद्ध इंडियावाद?
हा संपूर्ण वाद G-20 च्या डिनरच्या निमंत्रणावरुन सुरू झाला. G-20 शिखर परिषदेच्या डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर 'President of India' ऐवजी 'President of Bharat' असे लिहिले होते. निमंत्रण पत्र बाहेर आल्यानंतर मोदी सरकार देशाच्या नावात इंडिया हा शब्द वापरणे बंद करून केवळ भारत म्हणण्याचा डाव आखत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. इंडियाचे नाव बदलून भारत व्हावे, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

वादाची सुरुवात बंगळुरुपासून 
विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A नाव दिल्यानंतर हा वाद सुरू झाला. यामुळेच सत्ताधारी पक्ष देशाचे नाव बदलण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. 17-18 जुलै रोजी बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. 26 विरोधी पक्षांनी भाजप सरकारच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्या आघाडीचे नाव इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) असे जाहीर केले होते. या घोषणेनंतर भाजपने इंडिया, हे इंग्रजांनी दिलेल्या गुलामगिरीचे नाव असल्याचे म्हणत, विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. 

 

Web Title: Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final: Some wish 'INDIA' and some wish 'Bharat'; Political batting starts after Asia Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.