अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर आरोप करणाऱ्या आशुतोष महाराजांवर प्राणघातक हल्ला, शौचालयात लपून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:17 IST2026-03-08T10:16:38+5:302026-03-08T10:17:42+5:30
Ashutosh Maharaj shankaracharya avimukteshwaranand: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर आरोप करणाऱ्या आशुतोष महाराज यांच्यावर रेल्वे प्रवासात प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर आरोप करणाऱ्या आशुतोष महाराजांवर प्राणघातक हल्ला, शौचालयात लपून वाचवला जीव
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरोधात न्यायालयात लैंगिक अत्याचार प्रकरणाची याचिका दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी महाराजांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. रीवा एक्स्प्रेस या रेल्वे गाडीने ते प्रयागराजला जात होते, त्याचवेळी काही लोकांनी त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. त्यांचे नाक कापण्याचाही प्रयत्न झाला. हल्लेखोरांना चुकवून ते रेल्वेच्या शौचालयात घुसले आणि स्वतःचा जीव वाचवला.
आशुतोष महाराज हे सकुमारी पीठ येथून गाझियाबादपर्यंत खासगी गाडीने आले, कारण त्यांचे तिकीट गाझियाबाद ते प्रयागराज असे होते. रीवा एक्स्प्रेसमधून ते प्रयागराजला निघाले. पहाटे पाच वाजता एक्स्प्रेस कौशांबी जिल्ह्यातील सिराथू रेल्वे स्थानकावर पोहोचली त्यावेळी आशुतोष महाराज यांच्यावर हल्ला झाला.
आशुतोष महाराजांनी सांगितला घटनाक्रम
हल्ल्याच्या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आशुतोष ब्रह्मचारी महाराज म्हणाले, "आम्ही सकुमारी पीठातून स्वतःच्या गाड्यांवरून आलो. गाझियाबादवरून आमचे तिकीट होते. रीवा एक्स्प्रेसमधून येत होतो. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान, धारदार शस्त्रांनी आमच्यावर हल्ला करण्यात आला."
"माझे नाक कापण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्यावर हल्ला झाला. शौचालयात बसून आम्ही आमचा जीव वाचवला. अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराचा खटला दाखल केला होता. त्यानंतर माझी नाक कापून आणणाऱ्याला २१ लाख रुपये देऊन अशी घोषणा करण्यात आली होती. त्यातूनच आमच्या हत्या करण्याचा प्रयत्न झाला", असा आरोप आशुतोष महाराज यांनी केला.
मी या प्रकरणी प्रयागराजमध्ये तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविमुक्तेश्वरानंद, मुकुंदनंद, अरविंद, प्रकाश आणि दिनेश शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. आम्ही न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी येत होतो, असे आशुतोष महाराज यांनी सांगितले.
Prayagraj, Uttar Pradesh: Ashutosh Brahmachari Maharaj says, "We had come from Sakumari Peeth in our own vehicles because our tickets were from Ghaziabad, and we arrived by the Rewa Express at around 5 a.m. Suddenly, about 10–11 people attacked us. They tried to cut off my nose… pic.twitter.com/rbGuxRyWLh
— IANS (@ians_india) March 8, 2026
धारदार शस्त्रांनी वार केल्यामुळे आशुतोष महाराज जखमी झाले होते. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेतच कॉल्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लहान मुलींचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून, त्यासाठी आशुतोष महाराज हे प्रयागराजला येत होते.