आसारामबापू प्रकरण; साक्षीदाराचा मृत्यू

By Admin | Updated: June 11, 2014 14:08 IST2014-06-11T01:11:16+5:302014-06-11T14:08:16+5:30

आसारामबापू यांचे माजी सहकारी व आयुव्रेदाचे चिकित्सक अमृत प्रजापती यांचा आज मृत्यू झाला. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.

Asaram Bapu episode; Death of witness | आसारामबापू प्रकरण; साक्षीदाराचा मृत्यू

आसारामबापू प्रकरण; साक्षीदाराचा मृत्यू

>अहमदाबाद : आसारामबापू यांचे माजी सहकारी व आयुव्रेदाचे चिकित्सक अमृत प्रजापती यांचा आज मृत्यू झाला. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. 
23 मे रोजी राजकोट येथे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ते मृत्यूशी झुंज देत असताना उधव भागातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आसारामबापू व त्यांचे चिरंजीव नारायण साई यांच्याविरुद्धच्या लढय़ात प्रजापती यांनीही आपला आवाज मिसळला होता. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आसारामबापूंवर सुरूअसलेल्या खटल्यामध्ये ते  महत्त्वाचे साक्षीदार होते. प्रजापतींच्या कुटुंबियांच्या मते त्यांच्यावरील गोळीबार हा आसाराम व साई यांच्या सांगण्यानुसार केला गेला होता. राजकोट येथे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
(वृत्तसंस्था)
 
 
 
 
       

Web Title: Asaram Bapu episode; Death of witness