Asad Ahmed Encounter: यावेळी कार नाही बाईक उलटली, ४८ दिवस फरार असलेल्या असदचा असा झाला एन्काऊंटर, जाणून घ्या इनसाइड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 05:52 PM2023-04-13T17:52:35+5:302023-04-13T21:19:50+5:30

Asad Ahmed Encounter: उत्तर प्रदेशमधील कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद याला आज उत्तर प्रदेश एसटीएफच्या टिमने झाशी येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार केले. असद अहमद याला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोधत होते.

Asad Ahmed Encounter: This time it was not a car but a bike overturned, this was the encounter of Asad who was absconding for 48 days, know the inside story | Asad Ahmed Encounter: यावेळी कार नाही बाईक उलटली, ४८ दिवस फरार असलेल्या असदचा असा झाला एन्काऊंटर, जाणून घ्या इनसाइड स्टोरी

Asad Ahmed Encounter: यावेळी कार नाही बाईक उलटली, ४८ दिवस फरार असलेल्या असदचा असा झाला एन्काऊंटर, जाणून घ्या इनसाइड स्टोरी

googlenewsNext

उत्तर प्रदेशमधील कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद याला आज उत्तर प्रदेश एसटीएफच्या टिमने झाशी येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार केले. असद अहमद याला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोधत होते. दरम्यान, असद हा झाशी येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असद आणि त्याचा सहकारी गुलाम हे बाईकवरून जात होते. तेवढ्यात एसटीएफच्या टीमने त्यांना घेरले आणि अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरेंडर करण्याऐवजी दोघांनीही पोलिसांवरच गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारामध्ये असद आणि गुलाम हे मारले गेले.

उत्तर प्रदेशचे एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या मोहिमेवर विशेष पथके काम करत होती असं सांगितलं, आज दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारावर काही लोकांना घेरण्यात आले. त्यामध्ये २४ फेब्रुवारीच्या घटनेत ज्यांना सर्वांनी पाहिले होते, ते चकमकीमध्ये जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयाच त्यांचा मृत्यू झाला. २४ फेब्रुवारीच्या घटनेत उत्तर प्रदेश पोलीस दलातील दोन बहादूर पोलिसांचाही मृत्यू झाला होता, असे प्रशांत कुमार यांनी यावेळी नमूद केले.

मीडिया रिपोर्ट्स नुसार उमेश पाल हत्याकांड प्रकरणानंतर असद आणि गुलाम हे दिल्लीतील संगम विहार भागात १५ दिवस लपले होते. दिल्लीमध्ये चौकशी केल्यावर एसटीएफला याची माहिती मिळाली की असद आणि गुलाम हे अजमेरच्या दिशेने निघाले आहेत. काही दिवस तिथे राहिल्यावर ते झाशीकडे निघाले. मात्र वाटेतच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी त्यांना घेरले. तिथे झालेल्या चकमकीत एसटीएफने त्यांना ठार केले.  गुलाम आणि असद यांच्यावर प्रत्येक ५ लाख रुपयांचा इनाम होता.

असद अहमद आणि गुलाम यांचा एन्काऊंट करणाऱ्या टिममध्ये १२ जणांचा समावेश होता. त्यात दोन डेप्युटी एसपी, २ कमांडो, २ इन्स्पेक्टर, १ एसआय आणि ५ हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश होता. या एन्काऊंटरचं नेतृत्व डेप्युटी एसपी नावेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांनी केलं. एन्काऊंटरनंतर असद अहमदच्या मृतदेहाजवळून ब्रिटिश बुलडॉग रिवॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे.  

Web Title: Asad Ahmed Encounter: This time it was not a car but a bike overturned, this was the encounter of Asad who was absconding for 48 days, know the inside story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.