अरविंद केजरीवाल यांचं संभाव्य मंत्रिमंडळ!

By Admin | Updated: February 13, 2015 18:52 IST2015-02-13T18:52:31+5:302015-02-13T18:52:31+5:30

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून बरोबर एक वर्षानंतर उद्या अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

Arvind Kejriwal likely cabinet! | अरविंद केजरीवाल यांचं संभाव्य मंत्रिमंडळ!

अरविंद केजरीवाल यांचं संभाव्य मंत्रिमंडळ!

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १३ - दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून बरोबर एक वर्षानंतर उद्या अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या रामलीला मैदानावर शपथविधी पार पडणार असून त्यासाठीची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. उद्या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अन्य पाच जण शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया, सतेंद्र जैन, जितेंद्र तोमर, संदीप कुमार, असीम अहमद यांचा समावेश होणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असून संभाव्य खातेवाटप पुढीलप्रमाणे अरविंद केजरीवाल झ्र मुख्यमंत्री मनीष सिसोदिया - उपमुख्यमंत्री, शिक्षण, शहरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम सतेंद्र जैन झ्र उद्योग आणि आरोग्य मंत्री जितेंद्र तोमर झ्र कायदेमंत्री संदीप कुमार - महिला आणि बाल विकास, सामाजिक न्याय असिम अहमद झ्र अन्न आणि पुरवठा

Web Title: Arvind Kejriwal likely cabinet!