शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या रिक्षाचालकाला अटक राहाता तालुक्यातून अटक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने रचला सापळा

By admin | Updated: August 24, 2016 00:54 IST

नाशिक : आठवडाभरापूर्वी शालिमारच्या एका लुटारू रिक्षाचालकाने आपल्या मित्राच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकाला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रिक्षातून नेऊन धमकावत २० हजाराचा माल लुटला होता. याप्रकरणी संशयिताला राहाता तालुक्यातून भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.

नाशिक : आठवडाभरापूर्वी शालिमारच्या एका लुटारू रिक्षाचालकाने आपल्या मित्राच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकाला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रिक्षातून नेऊन धमकावत २० हजाराचा माल लुटला होता. याप्रकरणी संशयिताला राहाता तालुक्यातून भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शालिमार रिक्षा थांब्यावरून एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला उत्तमनगरला जाण्यासाठी प्रमोद अनंत देशमुख ( रा. उत्तमनगर) हे रिक्षात (एम.एच.१५ एके ५२३९) बसले होते. दरम्यान, रिक्षाचालक अनिल छबू जाधव (२०, हेडगेवार चौक, सिडको) याने त्याच्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने देशमुख यांना दीड तास शहरात फिरविले. देशमुख यांच्या हातात सोन्याची अंगठी, मनगटी घड्याळ, रोख रक्कम, महागडा मोबाइल पाहून या दोघांनी त्यांना लुटण्याचा इरादा केला. कृषिनगर परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नेऊन दोघांनी मिळून देशमुख यांना धमकावले. अंगठी, मोबाइल, एक हजाराची रक्कम, मनगटी घड्याळ असा एकूण १९ हजार ९२० रुपयांचा माल लुटला व रिक्षातून पळ काढला. याप्रकरणी देशमुख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध फिर्याद दिली होती. आठवडाभरापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी शहरातील रिक्षा थांब्यावर लुटारूच्या संशयास्पद रिक्षाचा शोध घेत होते. रिक्षाचा क्रमांकही देशमुख यांनी बघितलेला नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती; मात्र त्यांनी सांगितलेल्या रिक्षेच्या वर्णनावरून पोलीस रिक्षाचा शोध घेत होते. पोलिसांना संशयित जाधव हा कोळपेवाडी (ता. राहाता) येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तांबे यांनी विशेष पथक जाधवच्या मागावर पाठविले. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी पोलीस कर्मचार्‍यांसमवेत संशयित रिक्षाचालक जाधव यास रिक्षासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याची अंगठी, मोबाइल, एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आला आहे. रिक्षाचा मालक, अल्पवयीन साथीदार आदिबाबत संशयिताकडे चौकशी सुरू असून अधिक तपास वारे करीत आहेत.