शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

'अटक करायची असेल तर करा, पण मी पश्चिम बंगालला जाणारच'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 4:16 PM

भाजपा अध्यक्ष 11 ऑगस्टला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली: परवानगी मिळो, अथवा न मिळो, मी पश्चिम बंगालला जाणारच, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. अमित शहा 11 ऑगस्टला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. माझा पश्चिम बंगाल दौरा निश्चित आहे. जर राज्य सरकारला मला अटक करायची असल्यास, त्यांनी ती जरुर करावी, असंही शहा म्हणाले. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आलं आहे. त्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहांचा पश्चिम बंगाल दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यातील 40 लाख लोकांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. कागदपत्रं नसली म्हणून काय नागरिकांना देशाबाहेर हाकलणार का?, असा प्रश्न बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी उपस्थित केला आहे. मायावती यांच्यासोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाला देशात गृहयुद्ध पेटवायचं आहे, असा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हा मुद्दा लावून धरला असताना दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष आणि खासदार अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांवर शरसंधान साधलं. राजीव गांधी पंतप्रधान असताना 1985 मध्ये आसाम करार करण्यात आला. मात्र या कराराची अंमलबजावणी करण्याची हिंमत काँग्रेसनं दाखवली नाही. मात्र भाजपानं हे धाडस दाखवलं आणि राजीव गांधींना जे जमलं नाही, ते करुन दाखवलं, असं शहा राज्यसभेत म्हणाले. 40 लाख घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय, असा सवाल उपस्थित करत शहांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला होता. यानंतर काँग्रेस खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगालNational Register of CitizensएनआरसीAssamआसामMamata Banerjeeममता बॅनर्जी