शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेनाप्रमुखांनी केली होती प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची शिफारस

By admin | Updated: June 29, 2014 14:47 IST

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर निघणारी परेड हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असला तरी १९७२ मध्ये भारतीय सैन्य मुख्यालयाने प्रजासत्ताक दिनी होणारी परेड रद्द करण्याची शिफारस केली होती.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २९- प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर निघणारी परेड हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असला तरी १९७२ मध्ये भारतीय सैन्य मुख्यालयाने प्रजासत्ताक दिनी होणारी परेड रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकविरोधातील युद्धात मिळालेला विजय साजरा करण्यासाठी ही शिफारस मान्य केली नव्हती. 
भारतीय सैन्यातील प्रमुख अधिकारी फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्यावर आधारित एका पुस्तकात हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. माणेकशॉ यांचे सहकारी सेवानिवृत्त ब्रिगेडियर बेहराम पांथाकी आणि त्यांची पत्नी जेनोबिया यांनी 'फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ: द मॅन इन हिज टाइम्स' हे पुस्तक लिहीले असून या पुस्तकात त्या काळातील काही महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे. 'पाकिस्तानवर विजय मिळाल्याने भारतीय सैन्यावरील १९६२ मध्ये चीन युद्धात झालेल्या पराभवाचे डाग पुसले गेले होते.  भारतीय सैन्याची तुकडी युद्धभूमीत असल्याने सैन्य मुख्यालयाने प्रजासत्ताक दिनीहोणारी परेड रद्द करण्याची शिफारस केली होती.  मात्र इंदिरा गांधींना विजयाचा आनंदोत्सव साजरा करायचा होता. तसेच युद्दातील शहीदांना श्रध्दांजली द्यायची होती. त्यामुळे अल्पसूचनेवरच इंडिया गेटजवळ अमर ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती.' असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. १९७२ मध्ये प्रजासत्ताक दिनी माणेकशॉ यांची डिफेंन्स स्टाफच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा इंदिरा गांधींचा प्रस्ताव होता. मात्र तत्कालीन जगजीवन राम यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. 
काश्मीरवरुन नेहरु गोंधळले होते
१९४७ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीर घाटीच्या दिशेने आगेकूच केली होती. यावर ठोस निर्णय घेताना तत्कालीन पंतप्रधान नेहरु गोंधळले होते. मात्र तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी नेहरुंचे मतपरिवर्तन केले. नेहरुंना काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्राकडे न्यायचा होता. घुसखोरांविरोधात लष्करी कारवाई केली तर अन्य देश त्यावर काय प्रतिक्रिया देतील याविषयी नेहरुंना चिंता होती. यावर पटेल नेहरुंना म्हणाले, तुम्हाला काश्मीर हवा की नको ?. यावर नेहरुंनी काश्मीर हवा असे उत्तर दिले. यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोर दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असा महत्त्वपूर्ण उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे.