शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; न्यायालयानं निकाल राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 16:38 IST

Ram Mandir Case : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता

नवी दिल्ली: कित्येक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. गेल्या ४० दिवसांपासून अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. अखेर आज या प्रकरणातील शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामुळे लवकरच या प्रकरणात न्यायालय निकाल देऊ शकतं. अयोध्येतील ऐतिहासिक जमीन वाद प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठानं सुनावणी घेतली. रंजन गोगोई १८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. आज सुनावणीच्या अखेरच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांमध्ये युक्तिवादादरम्यान शाब्दिक चकमक झाली. यावेळी मुस्लिम पक्षकारांच्या वकिलानं हिंदू पक्षाच्या वतीनं जमा करण्यात आलेला नकाशा फाडला. मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलानं नकाशा फाडताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'आम्ही अशा प्रकारे सुनावणी सुरू ठेवू शकत नाही. लोक कधीही उभे राहून बोलू लागतात. आम्हीदेखील उभे राहू शकतो आणि या प्रकरणाची सुनावणी संपवू शकतो,' असं संतप्त उद्गार गोगोईंनी काढले. सुनावणीच्या ४० व्या दिवशी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी एक पुस्तक आणि काही दस्तावेज यांच्यासह वादग्रस्त राज जन्मभूमीची ओळख पटवून देणारा नकाशा न्यायालयासमोर ठेवला. मात्र मुस्लिम पक्षकारांच्या बाजूनं युक्तिवाद करणाऱ्या वकील राजीव धवन यांनी नकाशावर आक्षेप घेतला. मला हा दस्तावेज फाडण्याची परवानगी आहे का?, असं म्हणत त्यांनी नकाशाचे तुकडे केले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRam Mandirराम मंदिर