एप्रिलमध्ये जागतिक अन्नधान्य किमतीत १.६ टक्के झाली घट

By Admin | Updated: May 9, 2014 23:54 IST2014-05-09T23:54:12+5:302014-05-09T23:54:12+5:30

संयुक्त राष्ट्रातील अन्नधान्य संस्था एफएओनुसार चालू वर्षात एप्रिलमध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमतीत एकूण १.६ टक्क्याची घट झाली.

In April, global food prices declined by 1.6 percent | एप्रिलमध्ये जागतिक अन्नधान्य किमतीत १.६ टक्के झाली घट

एप्रिलमध्ये जागतिक अन्नधान्य किमतीत १.६ टक्के झाली घट

 नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रातील अन्नधान्य संस्था एफएओनुसार चालू वर्षात एप्रिलमध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमतीत एकूण १.६ टक्क्याची घट झाली. मुख्यत: डेअरी, साखर आणि वनस्पती तेलाच्या किमतीत घसरण झाली. खाद्य व कृषी संघटनेने (एफएओ) आपल्या अहवालात म्हटले की, डेअरी उत्पादनांच्या किमती घसरल्याने खाद्यान्न वस्तूंचे दर कोसळले. यादरम्यान साखर आणि वनस्पती तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली. दुसरीकडे धान्य आणि मांसाच्या किमतीत किंचित तेजी आली. अहवालानुसार ५५ खाद्य जिंस असलेल्या एफएओचा निर्देशांक एप्रिल महिन्यात सरासरी २०९.३ अंक होता. हा निर्देशांक मार्च महिन्यापेक्षा १.६ टक्क्याने कमी, तर एप्रिल २०१३ पेक्षा ३.५ टक्क्यांनी कमी आहे. रोमस्थित संस्था एफएओनुसार एप्रिलमध्ये डेअरीच्या किमतीत अगोदरच्या महिन्याच्या तुलनेत ६.९ टक्क्यांची घसरण झाली. चीन व रशियातून डेअर उत्पादनाची खरेदी न झाल्याचा हा परिणाम आहे. चीन पूर्ण व स्किम्ड दूध पावडरचा मुख्य आयातक देश आहे. रशिया हा चीझचा मुख्य आयातक देश आहे. त्याचप्रमाणे जागतिक साखरेच्या किमतीत मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात १.६ टक्के घट झाली. त्यामुळे थायलंड, भारत आणि आस्ट्रेलियासह मुख्य उत्पादक देशात साखरेची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. युरोपीय संघाकडून अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात मागणी मिळाल्याने व पामतेलाच्या किमतीत घसरण झाल्याने या महिन्यात वनस्पती तेलाची किंमत २.८ टक्क्यांनी कमी झाली. एफएओने सांगितले की, या काळात सोयाबीन तेलाच्या किमतीत किंचित तेजी आली. एप्रिल महिन्यात मार्चपेक्षा धान्यांच्या किमतीत ०.५ टक्क्याची वाढ झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: In April, global food prices declined by 1.6 percent