३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:24 AM2024-03-01T06:24:39+5:302024-03-01T06:24:49+5:30

अकरा वर्षांपूर्वी, १८ जुलै २०१३ रोजी मंजूर झालेला हा प्रकल्प २३ हजार १३६ कोटींचा होता.

Approval of budget of 37 thousand 276 crores of underground metro | ३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या ३३.५ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाइन-३, कुलाबा-बांद्रा-सीप्झ कॉरिडॉरच्या ३७ हजार २७६ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला गुरुवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

अकरा वर्षांपूर्वी, १८ जुलै २०१३ रोजी मंजूर झालेला हा प्रकल्प २३ हजार १३६ कोटींचा होता. पण, ११ वर्षांत प्रकल्प खर्चात वाढ झाल्याने केंद्रीय मंत्रीमंडळाची नव्याने मंजुरी आवश्यक होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिल्लीतील कार्यालयाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला.

या सुधारित प्रकल्प खर्चात केंद्र सरकारचा वाटा ४ हजार ५९० कोटींचा, राज्य शासनाचा ८,४०१ कोटींचा, एमएमआरडीएचे अनुदान ६७९ कोटींचे, मियालचा वाटा ७७ कोटींचा, संपत्तीच्या विकासातून १००० कोटी तर जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीचा वाटा २१ हजार २८० कोटींचा असेल.

nकुलाबा - वांद्रे - सीप्झ या मेट्रोचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा एप्रिल ते मे महिन्यात सुरु  होईल.
nआता मेट्रो १, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सेवेत असून, भुयारी मेटोमुळे प्रवाशांना पश्चिम उपनगरातून वांद्रयापर्यंत येता येईल. 

nपहिला टप्पा : आरे ते बीकेसी
nस्थानके : १०, ९ भुयारी 
    तर १ जमिनीवर
nअंतर : १२.४४ किलोमीटर
nदुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड
nस्थानके : १७
nअंतर : २१.३५ किलोमीटर 

Web Title: Approval of budget of 37 thousand 276 crores of underground metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो