शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्य निर्मूलनासाठी महत्त्वाकांक्षी योजना मंजूर

By admin | Updated: September 26, 2015 21:58 IST

येत्या १५ वर्षांत जगातून गरिबी उच्चाटन करून विषमता दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ सदस्य देशांनी मान्यता दिली आहे

संयुक्त राष्ट्रे : येत्या १५ वर्षांत जगातून गरिबी उच्चाटन करून विषमता दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ सदस्य देशांनी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर ‘टिकाऊ विकासा’संबंधी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेची सांगता झाली.‘टिकाऊ विकास’ योजनेतहत आगामी १५ वर्षांत भूक आणि दारिद्र्य समाप्त करावयाचे आहे. त्याचबरोबर स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना सन्मानित जीवन जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ऐतिहासिक वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील सर्व नेते उपस्थित होते.१९३ सदस्यीय महासभेने ‘आपल्या जगात बदल : टिकाऊ विकासासाठी २०३० ची कार्यक्रमपत्रिका’ हा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावातच पुढील १५ वर्षांत ‘दारिद्र्याचे पूर्णपणे उच्चाटन, विषमता आणि हवामानातील बदल’ या मुद्यावर ‘१७ उद्दिष्टे’ आणि ‘१६९ लक्ष्य’ निश्चित केले आहेत.अनेक वर्षे आणि महिने सखोल चर्चा करून ही नवीन कार्यक्रमपत्रिका मंजूर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या ७० व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित महासभेसाठी जागतिक वित्तीय संस्थांचे प्रमुख आणि अन्य ज्येष्ठ नेते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आले असताना या महत्त्वाकांक्षी योजनेला मान्यता देण्यात आली.संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या कार्यक्रमपत्रिकेला ‘बिगुल’ या शब्दात संबोधले. ते म्हणाले की, हीच कार्यक्रमपत्रिका सर्वांना समान जीवन जगण्याची, समृद्धीची, शांतीची, सशक्त करणाची संधी देणार आहे. सध्याची पिढी आणि भावी पिढी यांना ही कार्यक्रमपत्रिका फायद्याची ठरेल. (वृत्तसंस्था)1 आगामी १५ वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी जी १७ उद्दिष्टे निश्चित केली आहेत, त्यात दारिद्र्याचे संपूर्णपणे निर्मूलन, भूक पूर्णपणे दूर करणे, उच्च शिक्षण, समानता, स्थिर शहर आणि समाज, तसेच स्वच्छ पाणी आणि साफसफाई यांचा समावेश आहे. 2 २०१५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांसाठी ऐतिहासिक ठरेल, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. यातून कोणताही देश विकासापासून दूर राहणार नाही आणि विकासाची व्याख्याच बदलेल, असे या अधिकाऱ्यांना वाटते.3 त्यातून याच वर्षी जागतिक हवामान बदलविषयक कराराला प्रोत्साहन मिळेल. अमेरिकेत प्रथमच आलेले पोप फ्रान्सिस यांनी महासभेत ऐतिहासिक भाषण केले.