शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

कर्नाटकात अँटी करप्शन ब्युरोची छापेमारी, सरकारी अधिकाऱ्यांकडून 72 कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 4:02 PM

एसीबीच्या छाप्यादरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातील पाण्याच्या पाईपमधून 13 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

बंगळुरू: गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकातील(Karnataka) विविध जिल्ह्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची(Anti Corruption Bureau) छापेमारी सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर सुरू असलेल्या या छापेमारीत आतापर्यंत 72.52 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या छाप्यात एसीबीने बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय असलेल्या 15 सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. 

बुधवारी एसीबीच्या 503 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 68 ठिकाणी छापे टाकले. या सर्वांची 68 पथकांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यांच्या कारवाईत या पथकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने, सोन्याचे दागिने, गुंतवणुकीची कागदपत्रे, शेअर बॉण्ड्स आणि जमिनीची कागदपत्रे जप्त केली आहेत. या छापेमारीत सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या उत्पनाच्या शेकडो टक्के अधिकची संपत्ती मिळाली आहे. कारवाई अजूनही सुरुच आहे.

सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यवधीची मालमत्ताकर्नाटक एसीबीने कलबुर्गीमधील एका पीडब्ल्यूडीचा कनिष्ठ अभियंता एस.एम. बिरादार याच्या घरातील पाण्याच्या पाईपमधून 14 लाख रुपये जप्त केले, तर घरात इतर ठिकाणी लपवलेल्या पैशांसह 4.15 कोटी जप्त केले. इतर एका अधिकाऱ्याकडून 7 किलो सोने जप्त करण्यात आले. एसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार गुरुवारपर्यंत 15 सरकारी अधिकाऱ्यांकडून 72.52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बंगळुरू ग्रामीणच्या जिल्हा निर्मिती निर्मिती केंद्राचे प्रकल्प संचालक आर. एस. वासुदेव याच्याकडून एकूण 18.2 कोटींची मालमत्ता मिळाली. हा आकडा त्यांच्या उत्पन्नापेक्षा 879.53 टक्के अधिक आहे.

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीबंगळुरूमधील बीबीएमपीमधील ग्रुप डी कर्मचारी असलेला जीव्ही गिरी याच्या घरातून 6.24 कोटी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा 563 टक्के अधिक आहे. कलबुर्गीमधील कनिष्ठ अभियंत्याकडून जप्त केलेली संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा 406 टक्के अधिक आहे. गडग जिल्ह्याचे कृषी सहसंचालक टीएस रुद्रेश याच्या घरातून 6.65 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली, जी त्याच्या उत्पन्नापेक्षा 400 टक्के अधिक आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागraidधाड