राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:09 IST2025-06-11T13:07:32+5:302025-06-11T13:09:30+5:30

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आणखी एक व्यक्ती सामील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या व्यक्तीचा राज कुशवाहशी थेट संबंध होता. 

Another name has surfaced in the Raja Raghuvanshi case, has a direct connection to Sonam-Raj! Who is 'this' person? | राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 

राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 

राजा रघुवंशी प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सुरुवातील सोनम आणि राजा बेपत्ता झाले, त्यानंतर राजाचा मृतदेह सापडला आणि हे प्रकरण वेगळ्याच दिशेला गेलं. यानंतर सोनमने आपणच राजाची हत्या घडवून आणल्याचे कबूल केले आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणात सोनमसह आणखी चार नावं चर्चेत आली होती.  राज कुशवाह, सोनम रघुवंशी, विशाल सिंह चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांची नावे या प्रकरणात समोर आली होती. मात्र, आता यात आणखी एक नाव समोर आले असून, हा व्यक्ती नेमका कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. 

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आणखी एक व्यक्ती सामील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या व्यक्तीचे नाव जितेंद्र रघुवंशी असून, याचा राज कुशवाहशी थेट संबंध होता. 

जितेंद्रचं राजशी कनेक्शन 

सोनम रघुवंशी हीच कथित प्रियकर राज कुशवाहा हा जितेंद्र रघुवंशी नावाच्या व्यक्तीसोबत हवाला व्यवसाय करत होता. पोलिसांना जितेंद्रच्या नावावर ४ बँक खाती देखील सापडली आहेत, ज्यामध्ये तब्बल लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. आता या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी पोलीस जितेंद्र रघुवंशीचा शोध घेत आहेत.

सोनम रघुवंशीचा संपूर्ण व्यवसाय राज कुशवाह सांभाळत होता. राज कुशवाह पैशांच्या व्यवहारांचा हिशोब ठेवत होता. याबद्दल सोनम आणि राज यांच्यात अनेकदा बोलणं देखील होत असे. सोनमने राजमार्फत जितेंद्रला काही पैसे दिले असतील आणि ते हवालाद्वारे दुसरीकडे पाठवले असतील, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांसमोर उभे राहिले प्रश्न 
आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात जितेंद्र रघुवंशी याचे नाव समोर आल्यानंतर आता पोलिसांसमोर आणखी काही प्रश्न उभे राहिले आहेत. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा मार्फत हवाला व्यवसायही केला का? सोनमने दुसरीकडे पैसे पाठवण्यासाठी हवालाची मदत घेतली का? हवालाद्वारे पैसे पाठवून सोनम राजासोबत दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा विचार करत होती का? जितेंद्र रघुवंशी यांचा राज कुशवाह आणि सोनमशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

राज कुशवाहाने सोनमच्या या व्यवसायातून ५० हजार रुपये घेतले होते आणि ते त्याच्या मित्रांना दिले होते. हेच पैसे घेऊन तिघे आरोपी शिलाँगला पोहोचले होते. आता पोलीस जितेंद्र रघुवंशीचा शोध घेत आहेत.

Web Title: Another name has surfaced in the Raja Raghuvanshi case, has a direct connection to Sonam-Raj! Who is 'this' person?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.