आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार गोत्यात

By Admin | Updated: September 11, 2016 08:46 IST2016-09-11T08:46:07+5:302016-09-11T08:46:07+5:30

आम आदमी पक्षाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता दिल्लीच्या ओखला मतदारसंघातून आपचे आमदार असलेले अमानतुल्ला खान हे वादात सापडले आहेत. छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला

Another MLA from Aam Aadmi Party | आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार गोत्यात

आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार गोत्यात

 -ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.11-आम आदमी पक्षाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता दिल्लीच्या ओखला मतदारसंघातून आपचे आमदार असलेले अमानतुल्ला खान हे वादात सापडले आहेत. छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून आरोप करणारी महिला ही त्यांच्या मेव्हण्याचीच पत्नी आहे. या प्रकरणी महिलेने जामिया नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे महिलेने स्वतःच्या पतीविरोधात देखील तक्रार दिली आहे.
गेल्या चार वर्षांपासून अमानतुल्ला त्रास देत असून यामध्ये स्वतःचा पतीदेखील अमानतुल्लाची साथ देतो अशी तक्रार या महिलेने केली आहे. पोलिसांनी  अमानतुल्लाविरोधात आयपीसी कलम 354, 506, 509, 498ए आणि 120बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच पोलिस अमानतुल्लाची चौकशी करण्याची शक्यता आहे.
संदीप कुमार सेक्स स्कॅण्डलमुळे विरोधकांच्या आणि लोकांच्या टीकेला सामेरं जावे लागलेल्या आपच्या अजून एका नेत्यावर आरोप झाल्याने आपच्या  अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 
 

Web Title: Another MLA from Aam Aadmi Party