शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पचौरींविरुद्ध आणखी एक तक्रार

By admin | Updated: February 12, 2016 03:53 IST

विद्यार्थ्यांनी निषेधाचा पवित्रा घेतल्यानंतर दि एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटचे (टेरी) प्रमुख डॉ. आर. के. पचौरी रजेवर गेले आहेत. ‘टेरी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पचौरी यांच्या हातून पदवी

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांनी निषेधाचा पवित्रा घेतल्यानंतर दि एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटचे (टेरी) प्रमुख डॉ. आर. के. पचौरी रजेवर गेले आहेत. ‘टेरी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पचौरी यांच्या हातून पदवी/ प्रमाणपत्रे घेण्यास नकार दिल्यानंतर पचौरी यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. ते ७ मार्च रोजी होणाऱ्या या पदवीदान समारंभाला हजर राहणार नसल्याचे समजते. दरम्यान संस्थेतील आणखी एका महिलेने पचौरी यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे.संस्थेचे कुलपती पचौरी यांनी गुरुवारी सकाळी रजेवर जाण्याचा आपला निर्णय कळविला. त्यांच्या जागी दीक्षांत समारंभाला लीना श्रीवास्तव या उपस्थित राहतील, अशी माहिती हंगामी कुलगुरू राजीव सेठ यांनी दिली. श्रीवास्तव ह्या संस्थेच्या कुलगुरू आहेत. पण त्या सुटीवर असल्याने त्यांचा कार्यभार सेठ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.पचौरी यांना कार्यकारी उपाध्यक्षपदी बढती देण्याच्या टेरीच्या गव्हर्निंग कौंसिलच्या निर्णयाचा विरोध करीत संस्थेच्या १९ विद्यार्थ्यांनी बुधवारी पचौरी यांच्या हातून पदवी/प्रमाणपत्रे घेण्यास नकार दिला होता. पचौरी यांची टेरीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा टेरीचे माजी कर्मचारी, माजी विद्यार्थ्यांनीही निषेध केला आहे. अजय माथुर यांनी महासंचालकपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पचौरी यांनी गेल्या ८ फेब्रुवारीला कार्यकारी उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)