शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर परीक्षा विभाग : ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१५, मार्च/ एप्रिल २०१६ च्या सर्व सत्र परीक्षा

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

सोलापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्‍या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

सोलापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्‍या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोपे झाले आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेनंतर गेल्या १0 वर्षात परीक्षा विभागाबाबतची ओरड कायम होती. पी. बी. पाटील यांनी परीक्षा नियंत्रकाची सूत्रे घेतल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने परीक्षा विभागातील कारभार सुधारण्यावर भर दिला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, अभियांत्रिकीसाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका, पेपर तपासणीसाठी बारकोडिंग प्रणाली आदींचा वापर करीत परीक्षा विभागाच्या कामात गती वाढवली. सहा-सहा महिने निकाल लागत नाही, रिचेकिंग होत नाही, अशी ओरड होणार्‍या परीक्षा विभागाने यंदाच्या वर्षी आवघ्या १५ दिवसात काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. प्रामुख्याने अभियांत्रिकीचे निकाल वेळेच्या आत लावून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यावर परीक्षा विभागाने भर दिला होता.
विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लावल्याने पुढील प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता आगामी परीक्षांच्या संभाव्य तारखाही सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक आल्याने बहुतांश महाविद्यालयांनी ते आपल्या महाविद्यालयातील नोटीस बोर्डावर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी लावले आहे. यंदा प्रथमच वेळापत्रक लवकर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
क्र.परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५मार्च/एप्रिल २0१६
१.बी.ए.,बी.कॉम., बी.एस्सी.ॲन्ड बी.एस.सी.(बायोटेक,एनटीप्री.ॲन्ड ईसीएस) २0/१0/२0१५२२/0३/२0१६
२.एम.ए.१६/११/२0१५१५/0४/२0१६
३.एम.एस.डब्लू.१६/११/२0१५१५/0४/२0१६
४.बी.बी.ए.0७/११/२0१५१५/0४/२0१६
५.एम.कॉम.१९/११/२0१५१५/0४/२0१६
६.बी.सी.ए.0७/११/२0१५१८/0४/२0१६
७.एम.बी.ए.डी.बी.एम.,एफई.,एसई., टी.ई., बी.ई.२६/११/२0१५0२/0५/२0१६
८. बी.ए.,एलएल.बी.,एलएल.एम.२७/११/२0१५0६/0४/२0१६
९.पी.जी.डी.सी.ए.१0/१२/२0१५१५/0४/२0१६
१0.एम.सी.ए. (कॉमर्स)0२/१२/२0१५0२/0५/२0१६
११.एम.एस्सी.,एम.सी.ए. (सायन्स), एम.ए. (कॅम्पस)१६/११/२0१५१५/0४/२0१६
१२. एम.ई., एम. फार्म१५/१२/२0१५0१/0६/२0१६
१३.एम.सी.ए.(इंजि.) बी.आर्च.बी.फार्म.0७/१२/२0१५0२/0५/२0१६
१४.बी.एड., एम.एड.,बी.पी.एड.,एम.पी.एड.१५/१२/२0१५0२/0५/२0१६
कोट...
कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या निर्देशावरून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजाचे नियोजन करता यावे यासाठी परीक्षा सुरू घेण्याच्या संभाव्य तारखा परीक्षा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत.
बी. पी. पाटील, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.