शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या लाचखोरीचा तपास करण्याची घोषणा

By admin | Updated: March 17, 2016 03:36 IST

तृणमूल काँग्रेसच्या पाच खासदारांच्या लाचखोरीसंबंधीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गाजले. या प्रकरणाचा आचारसंहिता समितीकडून तपास करण्याची

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या पाच खासदारांच्या लाचखोरीसंबंधीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गाजले. या प्रकरणाचा आचारसंहिता समितीकडून तपास करण्याची घोषणा लोकसभेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बुधवारी केली. लाच घेतल्याचे आरोप अतिशय गंभीर असून, त्यामुळे संसदेच्या विश्वासार्हतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत माकपच्या सदस्यांनी लाचखोरीसंबंधी तपास म्हणजे सरकार आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा आरोप केल्याने चांगलाच गदारोळ झाला.लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुुमित्रा महाजन यांनी आचारसंहिता समिती स्थापण्याची घोषणा केली. तृणमूलच्या खासदारांनी एका कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेतल्यासंबंधी स्टिंग आॅपरेशन समोर आल्यानंतर मंगळवारी संसदेत भाजप, काँग्रेस आणि माकपच्या सदस्यांनी एकजूट दाखवीत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांना घेरले होते. या प्रकरणी तपास होण्याची गरज आहे, असे सांगत सुमित्रा महाजन यांनी लोकसभेतील भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील १५ सदस्यीय समिती या प्रकरणाचा अभ्यास आणि तपास करून अहवाल सादर करील, असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)कसे आहे स्टिंग आॅपरेशन काही दिवसांपूर्वी एका पोर्टलने तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, सुल्तान अहमद, सुखेंद्र अधिकारी, काकोली घोष दस्तीदार आणि प्रसून बॅनर्जी तसेच राज्यसभा सदस्य मुकुल रॉय हे एका कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी नोटांची बंडले घेत असल्याचे दृश्य दाखविले होते. पैसे देत असलेले अधिकारी बनावट असल्याचा दावा सदर पोर्टलने केला होता.लाचखोरीच्या गंभीर आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी माकपच्या सदस्यांनी राज्यसभेत केली. स्टिंग आॅपरेशनचा व्हिडिओ खरा आहे काय? हा प्रश्नच आहे, असा सवाल तृणमूलचे डेरेक, ओ ब्रायन यांनी केला.