शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त मेहबूबा मुफ्तींनी पत्रकार परिषद संपविली

By admin | Updated: August 26, 2016 04:01 IST

काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा संयम संपला आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतची संयुक्त पत्रकार परिषद अनपेक्षितपणे संपविली

श्रीनगर : उत्तर देण्यास कठीण प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा संयम संपला आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतची संयुक्त पत्रकार परिषद अनपेक्षितपणे संपविली. खोऱ्यात सध्या सुरू असलेल्या निदर्शनांबाबत मेहबुबा यांच्या असलेल्या भूमिकेची तुलना त्यांनी २०१० मध्ये खोऱ्यातील अस्वस्थतेबाबत घेतलेल्या पवित्र्याशी करण्यात आल्यानंतर मुफ्ती यांचा संयम संपला. गुरुवारी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर मुफ्ती यांच्या शेजारी राजनाथ सिंह बसलेले होते.ते मेहबुबा यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. २०१० मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना फुटीरवाद्यांना तुरुंगात टाकणे व बळाचा वापर करण्यास मुफ्ती यांनी केलेल्या विरोधाची आठवण वार्ताहराने त्यांना करून दिली होती. ‘मुझे क्या बोलेंगे ये सर. मैने इनके बच्चों को बचाया है टास्क फोर्ससे’, असे मेहबुबा मुफ्ती संतापून म्हणाल्या आणि ‘थँक यू, आता तुम्ही चहा घेऊ शकता’, असे म्हणून पत्रकार परिषद संपविली.वार्ताहराने २०१० मधील आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय होती, असे विचारल्यावर मुफ्ती चिडलेल्या दिसल्या. तेव्हा अब्दुल्ला सरकारने मुलांविरुद्ध केलेला बळाचा वापर आणि हुरीयत कॉन्फरन्सच्या नेत्यांना केलेली अटक याबद्दल मुफ्ती यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी आपापल्या केवळ जागा बदलल्या आहेत, असेही या वार्ताहराने सांगितले. मेहबुबा म्हणाल्या, ‘‘हे विश्लेषण चुकीचे आहे. २०१० मध्ये मछीलमध्ये बनावट चकमक घडविण्यात आली होती व तिच्यात नागरिक ठार झाले होते. त्यानंतर शोपियानमध्ये बलात्कार आणि खून झाल्याचे आरोपही झाले होते.’’दरम्यान काश्मीरसंदर्भात राजनाथ सिंह यांच्या विधानाचे काँग्रेसने गुरुवारी स्वागत केले. सरकारची काश्मीरबाबतची आक्रमक भूमिका मवाळ झाल्याचे दिसते, असे सांगून काँग्रेसने स्वत: पंतप्रधानच सर्व संबंधितांशी चर्चेच्या माध्यमातून संवाद साधण्यास पुढाकार घेतील अशी आशा व्यक्त केली. काश्मीर खोऱ्यातील गेल्या ४८ दिवसांपासूनची अशांतता संपविण्यासाठी खुल्या मनाने संवाद साधण्यात यावा, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. खोऱ्यातील लोकांशी संवाद साधण्यासाठी सगळ््या पक्षांचा प्रक्रियेत सहभाग हवा या राजनाथ सिंह यांच्या विधानाचे सुरजेवाला यांनी स्वागत केले. गृहमंत्री आपल्या शब्दांना प्रत्यक्ष कृतीत आणून दु:खावर फुंकर घालणार असतील तर आम्ही व प्रत्येक भारतीय त्याचे स्वागतच करू, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)>पुलवामा जिल्ह्यात संचारबंदी कायमपुलवामा जिल्ह्यात गुरुवारी संचारबंदी वाढविण्यात आली तर श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यातील काही भागांत ती लागू आहे. काश्मीर खोऱ्यात चारपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावरील (जमावबंदी) मात्र गेल्या ४८ दिवसांपासून बंधने कायम आहेत. पुलवामामध्ये सुरक्षा दलांशी बुधवारी झालेल्या चकमकीत युवक ठार झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. श्रीनगर शहरातील परिस्थितीत काहीशी सुधारणा झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी मंगळवारी बऱ्याच भागातील संचारबंदी मागे घेतली.