शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
7
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
8
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
9
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
10
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
11
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
13
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
14
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
15
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
16
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
17
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
18
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
19
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
20
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी भररस्त्यात चोपले, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:43 IST

Andhra Pradesh: व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील इथानगरमध्ये गेल्या महिन्यात एका पोलिस कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तेनाली शहरातील पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिघांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी त्यांना रस्त्यावर बसवले अन् त्यांच्या पायावर काठीने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चेब्रोलू जॉन व्हिक्टर (25), शेख बाबूलाल (21) आणि डोमा राकेश (25) हे लड्डू नावाच्या एका प्रसिद्ध गुंडाचे जवळचे सहकारी आहेत. तेनाली शहर पोलिसांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी या तिघांनी 'किलर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणखी एका व्यक्तीसह कॉन्स्टेबल कन्ना चिरंजीवी यांच्यावर गांजाच्या नशेत हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी रविवारी आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

तत्पुर्वी पोलिसांनी या तिघांना रस्त्यावर बसवून लाठीने मारहाण केली. पोलिसांनी त्या तिघांना जमिनीवर बसवले अन् एका पोलिस अधिकाऱ्याने आरोपींच्या पायावर काठीने दणके दिले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकऱ्याला निलंबित करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत वायएसआर काँग्रेसचे नेते अंबाती रामबाबू यांनी राज्यातील सत्ताधारी चंद्राबाबू सरकारवर निशाणा साधला. सध्या राज्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आहे. व्हिक्टरवर नऊ गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. तर, राकेशवर सहा प्रलंबित खटले आहेत, ज्यामध्ये अशाच प्रकारचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  जनतेतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हवाला देऊन पोलिसांच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला, तर काहींनी कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे अशा सार्वजनिक शिक्षेच्या नैतिकतेवर चिंता व्यक्त केली.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू