Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. एका महिला डॉक्टरला HIV संक्रमित इंजेक्शन देण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या सूडबुद्धीतून हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला बी. बोया वसुंधरा (वय 34) हिने आपल्या पूर्वीच्या प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा राग मनात धरून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या कटात वसुंधरासोबत अडोनी येथील एका खासगी रुग्णालयातील नर्स कोंग ज्योती (वय 40) आणि तिची सुमारे 20 वर्षे वयाची दोन मुलेही सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींना 24 जानेवारी रोजी अटक करण्यात आली.
अपघाताचा बनाव, मदतीचा दिखावा आणि इंजेक्शन
पोलिसांच्या तपासानुसार, 9 जानेवारी रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास पीडित महिला डॉक्टर ड्युटीनंतर स्कूटरवरून घरी जात होती. यादरम्यान, केसी कालव्याच्या परिसरात दोन जणांनी मुद्दाम तिच्या स्कूटरला धडक दिली. अपघातात ती खाली पडली आणि जखमी झाली. यानंतर आरोपींनी मदतीचा दिखावा करत तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. याळी, ऑटो-रिक्षामध्ये बसवताना वसुंधराने HIV संक्रमित इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
HIV संक्रमित रक्ताचे नमुने कसे मिळवले?
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या HIV संक्रमित रुग्णांकडून रक्ताचे नमुने घेतले होते. नंतर ते रक्त रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवले आणि त्याच नमुन्यांचा वापर करून इंजेक्शन दिल्याचे आरोपींनी कबूल केले.
पीडितेचा पतीही डॉक्टर
पीडित महिला डॉक्टरच्या पतीने, जे स्वतःही डॉक्टर आहेत, 10 जानेवारी रोजी कुरनूल III टाउन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 126(2), 118(1), 272 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Web Summary : Andhra Pradesh: A woman, fueled by jealousy, allegedly injected her ex-lover's wife with HIV-infected blood. Four individuals, including a nurse and her children, have been arrested for this heinous crime, which involved staging an accident to administer the injection. The victim's husband, a doctor, filed the police complaint.
Web Summary : आंध्र प्रदेश: ईर्ष्या से प्रेरित होकर, एक महिला ने कथित तौर पर अपने पूर्व प्रेमी की पत्नी को एचआईवी संक्रमित रक्त का इंजेक्शन लगाया। एक नर्स और उसके बच्चों सहित चार लोगों को इस जघन्य अपराध के लिए गिरफ्तार किया गया है, जिसमें इंजेक्शन लगाने के लिए एक दुर्घटना का मंचन शामिल था। पीड़िता के पति, जो एक डॉक्टर हैं, ने पुलिस में शिकायत दर्ज कराई।