..तर दोघेही अंगावर धावून जाणार

By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:09+5:302015-04-24T00:55:09+5:30

या जुळ्या भावांपैकी एकाला जरी कोणी बोलले वा मारले की दोघेही त्याच्या अंगावर धावून जातात व त्याचा चांगलाच समाचार घेतात.

And then both of them will run on the body | ..तर दोघेही अंगावर धावून जाणार

..तर दोघेही अंगावर धावून जाणार

जुळ्या भावांपैकी एकाला जरी कोणी बोलले वा मारले की दोघेही त्याच्या अंगावर धावून जातात व त्याचा चांगलाच समाचार घेतात.
सोलापुरात सहारानगरमध्ये राहणारे व युनिक मोटार्सचे मालक जाफर मुख्तार शेख व साजिदा शेख यांची महंमद जोरान व महंमद आरुष ही जुळी मुले. यांच्या घरात यांच्या आई साजिदा यांचे मामा व मावशी हे जुळे होते.
7 मे 2012 ही जोरान व आरुष यांची जन्मतारीख. हिदामा स्कूल या शाळेत दोघेही नर्सरीमध्ये आहेत.
हे दोघेही जुळे असले तरी यांच्या दिसण्यात साम्य नाही, पण यांचा स्वभाव मात्र सारखाच आहे. स्वभावाने दोघेही रागीट आहेत. याला जे पाहिजे तेच त्यालाही पाहिजे असा यांचा ह? असतो. यांच्यापैकी एकाला जरी काही कारणाने राग आला की त्याचे पर्यवसान दोघांच्या भांडणात होते. मात्र यांच्यापैकी एकाला जरी कोणी बोलले तर दोघांनाही ते सहन होत नाही. यांच्या उंचीतही फरक असून मोठा लहान दिसतो तर लहान दिसतो मोठा. संगमेश्वर महाविद्यालयात पूर्वी असलेल्या उर्दू विभागाचे माजी विभागप्रमुख व त्यांचे आजोबा मुख्तार शेख यांचे दोघेही खूप लाडके.

संजय द. शिंदे
जॉन टेरीचे जुळे
इंग्लंडचा व्यावसायिक फुटबॉलपटू जॉन टेरी हा जुळ्यांचा पिता आहे. जॉर्जी जॉन व समर रोज अशी या जुळ्यांची नावे असून 18 मे 2006 रोजी यांचा जन्म झाला.

Web Title: And then both of them will run on the body