शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

...आणि गिरिराज सिंग यांना रडू कोसळले

By admin | Updated: April 22, 2015 00:31 IST

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्यासाठी मंगळवारचा दिवसही वाईट ठरला. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्यासाठी मंगळवारचा दिवसही वाईट ठरला. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली. त्यानंतर मंगळवारी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावले. भाजप संसद सदस्यांच्या बैठकीनंतर मोदी कार्यालयातच गिरिराज यांना भेटले. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी अगदी कडक शब्दात गिरिराज यांची कानउघाडणी केली, मोदी यांचे बोलणे चूपचाप ऐकणाऱ्या गिरिराज यांना अखेर रडू कोसळले. गिरिराजसिंग यांनी असे घडल्याचा इन्कार केला आहे. गिरिराज यांनी नंतर अशी काही बैठक झाल्याचा इन्कार केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी अशी भेट झालीच नाही, त्यामुळे रडू कोसळण्याचा प्रश्नच नाही, असे गिरिराजसिंग यांनी पत्रकारांना सांगितले. मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आपण भावुक झाला होता काय? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर बोलताना गिरिराज यांनी अशी भेट झाल्याचा इन्कार केला. अशी भेट झालीच नाही. मी पंतप्रधान मोदी यांना भेटलो असे कोणी सांगितले? असा प्रश्न गिरिराजसिंग यांनी विचारला. सिंग यांना सोमवारी लोकसभेत खेद व्यक्त करावा लागला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वर्णभेदी उद्गार काढणाऱ्या गिरिराजसिंग यांच्याविरोधात काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. त्यांना उत्तर द्या असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. त्यामुळे गिरिराज सिंग यांना माफी मागावी लागली. मला कोणालाही दुखवायचे नव्हते, माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे गिरिराज सिंग म्हणाले. गिरिराज सिंग यांच्या वक्तव्यामुळे महिलावर्गाचा अपमान झाला असून, गिरिराजसिंग यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली होती. गिरिराजसिंग हे केंद्रातील लघु व मध्यम उद्योगमंत्री आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)