शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

तनिष्कच्या जाहिरातीवरून झालेल्या वादाबाबत अमित शाहांचे मोठे विधान, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2020 20:24 IST

Amit Shah's Statement on Tanishq ad controversy : तनिष्कच्या जाहीरातीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देप्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड असलेल्या तनिष्कने प्रसारित केलेल्या एका जाहिरातीवरून निर्माण झाला होता मोठा वाद जाहिरातीबाबत बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होताअमित शाह म्हणाले की, अशा किरकोळ घटनांमुळे देशातील सामाजिक सद्भावनेला धक्का लागणार नाही

नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड असलेल्या तनिष्कने प्रसारित केलेल्या एका जाहिरातीवरून गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या जाहिरातीबाबत बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, तनिष्कच्या या जाहीरातीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. भारताची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. अशा किरकोळ घटनांमुळे देशातील सामाजिक सद्भावनेला धक्का लागणार नाही, असे विधान अमित शाह यांनी केले आहे.न्यूज १८ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे विधान केले आहे. त्यात अमित शाह म्हणाले की, भारतात सामाजिक समरसतेची पाळेमुळे भक्कम आहेत. त्यावर असे हल्ले करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. इंग्रजानींसुद्धा हा सद्भाव तोडण्याचा प्रयत्न केला. पुढे काँग्रेसनेसुद्धा तसाच प्रयत्न केला, असे अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी ओव्हरअ‍ॅक्टिव्हिझमविरोधात इशारासुद्धा दिला. ते म्हणाले की, मला वाटते की, अतिसक्रियतेचे कुठलेही रूप असता कामा नये.नेमका काय झाला होता वादतनिष्कने आपल्या नव्या ज्वेलरी कलेक्शनच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात एक नवी जाहिरात प्रसारित केली होती. ही जाहिरात प्रसारित होताच त्यावरून वादाला तोंड फुटले होते. 43 सेकंदाच्या या जाहिरातीत मुस्लिम कुटुंबात लग्न करून गेलेल्या हिंदू तरूणीसाठी तिच्या सासरचे लोक हिंदू प्रथेप्रमाणे डोहाळजेवण करण्याचा निर्णय घेतात. तनिष्कने युट्यूबवर ही जाहिरात पोस्ट केली होती. ह्यतिच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया करणाऱ्या घरात ती लग्न होऊन गेली. तिच्यासाठीच त्यांनी त्यांच्यात सहसा साजरा न होणारा सोहळाही साजरा केला. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीचा हा सुंदर मिलाफ आहे, ह्णअसे ही जाहिरात पोस्ट करताना लिहिण्यात आले होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाtanishqतनिष्कPoliticsराजकारण