काँग्रेस, सपा, बसपा एकत्र आले तरी भाजपला हरवू शकत नाहीत -अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:45 IST2021-11-14T05:45:17+5:302021-11-14T05:45:44+5:30
राज्यातील कायदा- सुव्यवस्था, माफियांविरुद्धची कारवाई, आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन याबाबत अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले.

काँग्रेस, सपा, बसपा एकत्र आले तरी भाजपला हरवू शकत नाहीत -अमित शहा
लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असा दावा केला की, काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र आले तरी भाजपला पराभूत करू शकत नाहीत.
४०३ विधानसभा मतदारसंघातील प्रभारी, जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील कायदा- सुव्यवस्था, माफियांविरुद्धची कारवाई, आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन याबाबत अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले.
शहा म्हणाले की, उत्तर प्रदेशातील २०२२ ची निवडणूक ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निर्णायक असेल. दिल्लीतील विजयाचा मार्ग याच राज्यातून जातो.
जेएएम म्हणजे...
शहा म्हणाले की, सपाचा जॅम (जेएएम) म्हणजे, जिन्ना, आझम खान आणि मुख्तार अन्सारी आहेत. तर, पंतप्रधान मोदी यांचा जॅम म्हणजे जनधन खाते, आधार कार्ड आणि प्रत्येकाला मोबाइल असा आहे.
येथे सुरू होत असलेल्या विद्यापीठाला महाराजा सुहेलदेव यांचे नाव देण्याची सूचना शहा यांनी केली. नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विद्यापीठाचे नाव महाराजा सुहेलदेव ठेवण्याची घोषणा केली.