Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:15 IST2026-04-03T16:11:15+5:302026-04-03T16:15:58+5:30
Amit Shah Rally cancelled: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर उतरवत असतानाच ही घटना घडली.

Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द
Amit Shah Latest News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आसाम दौऱ्यावर असताना अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हेलिकॉप्टर उतरवत असतानाच ही घटना घडली. त्यामुळे हेलिकॉप्टर न उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे शाह यांची गोलाकगूंज येथील प्रचासभा रद्द करण्यात आली.
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आसाममधील गोलाकगुंज येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अमित शाह हे हेलिकॉप्टरने पोहोचले, पण हेलिपॅडवर उतरत असतानाच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर न उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाहांनी मोबाईलवरून मागितली माफी
गोलाकगुंज येथील सभेला लोक आले होते. सभा हेलिकॉप्टर न उतरवता आल्याने रद्द करावी लागली. त्यानंतर अमित शाह यांनी मोबाईलवरून कॉल करून सभेला आलेल्यांशी संवाद साधला आणि सभेला येऊ न शकल्याबद्दल त्यांची माफी मागितली.
गोलाकगुंज येथील सभा रद्द झाल्यानंतर अमित शाह हे त्याच हेलिकॉप्टरने दूढनोई येथील प्रचारसभेसाठी निघून गेले.
आसामममध्ये १२६ जागांसाठी निवडणूक
आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी निवडणूक होत आहे. इथे सरकार स्थापन करण्यासाठी म्हणजे बहुमताचा आकडा ६४ इतका आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी आसाममध्ये मतदान होणार असून, ४ मे २०२६ निकाल जाहीर होणार आहे.
भाजपा विरुद्ध काँग्रेस
आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली NDA आघाडी विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी यांच्यात लढत होत आहे. भाजपा, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट हे प्रमुख पक्ष एनडीएमध्ये आहेत.
तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील Asom Sonmilito Morcha मध्ये रायजोर दल आणि आसाम जातीय परिषद हे पक्ष आहेत. तर बद्रुद्दीन अजमल यांचा AIUDF हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.